Friday, November 22, 2024
Homeपुणेमावळमळवली पाटण परिसरात PMRDA ची अतिक्रमण कारवाई ,अनधिकृत इमारती जमीनदोस्त !

मळवली पाटण परिसरात PMRDA ची अतिक्रमण कारवाई ,अनधिकृत इमारती जमीनदोस्त !

कार्ला : मळवली पाटण भागात अनाधिकृतपणे बांधण्यात आलेल्या इमारतीच्या अतिक्रमणावर PMRDA ने कारवाई करत अनधिकृत इमारती जमीनदोस्त केल्या.परिसरात अनधिकृत इमारती, बांधकाम करताना नैसर्गिक ओढे नाले यांचे प्रवाह अरुंद करणे , प्रवाह बदलणे असे प्रकार करणाऱ्या अतिक्रमण बांधकामांवर आज PMRDA ने कारवाई केली.

मळवली पाटण भागातील नैसर्गिक ओढे नाले आडविल्यामुळे मागील वर्षी या भागात मोठ्या प्रमाणात पुर आला होता . मळवली भागातील हॅबेटेड येथील शेकडो घरे तसेच परिसरातील बंगले पाण्याखाली गेले होते . मोठ्या प्रमाणात नागरिकांचे नुकसान ही झाले होते तर अनेक नागरिकांना बेघर व्हावे लागले तर काहींना घरातून रेस्कू करत बाहेर काढण्यात आले होते. यानंतर स्थानिक नागरिक , एकविरा कृती समिती , शिवभक्त विजय तिकोणे यांनी सदरचा मुद्दा उचलून धरल्यानंतर मावळचे आमदार सुनिल शेळके , मावळचे तहसीलदार , प्रांत यांच्यासह सर्व शासकीय यंत्रणांनी घटनास्थळी पाहणी करत अनाधिकृत बांधकामे काढण्याच्या सूचना दिल्या होत्या.या घटनेला एक वर्ष झाले तरी कारवाई होत नसल्याने एकविरा कृती समितीने आंदोलनाचा इशारा दिला होता . तसेच विजय तिकोणे यांनी मागील पंधरवड्यात ह्या विषयावर आवाज उठवत भर पाण्यात उपोषणाला बसण्याचा इशारा दिला होता . यानंतर आज PMRDA ने जेसेबी , पॉकलॅन , ब्रेकर अशी यंत्रे लावून सदरची कारवाई करत बांधकामे जमिनदोस्त केली.

यावेळी मावळ पंचायत समितीचे माजी सभापती दीपक हुलावळे , विजय तिकोणे , बाळासाहेब भानुसघरे , नंदकुमार पदमुले यांच्यासह कृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

- Advertisment -

You cannot copy content of this page