वडगाव मावळ : आमदार सुनील शेळके यांच्या अध्यक्षतेखाली मावळ पंचायत समितीमध्ये आढावा बैठक घेण्यात आली या बैठकीत मावळ तालुक्यात सुरु असलेल्या विविध विकास कामांचा आढावा घेण्यात आला .तसेच या बैठकीत मावळ पंचायत समितीच्या सर्व योजनांची माहिती देणाऱ्या www.mavaltaluka.com या वेबसाइटचे शेळके यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले .यावेळी आमदार शेळके यांनी तालुक्यात सुरू असलेल्या नळ पाणी पुरवठा योजना , रस्त्यांची कामे , घरकुल योजना , शाळा , अंगणवाडी , स्मशानभूमी आदी विकासकामांची सखोल माहिती घेऊन पूर्ण झालेल्या कामांबद्दल समाधान व्यक्त केले व संथगतीने सुरू असलेली कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या . त्याचबरोबर विकासकामांमध्ये येणाऱ्या अडचणी समजून घेऊन तात्काळ संबंधित गावचे सरपंच व अधिकारी यांचा समन्वय साधत अडचणी सोडविण्यात आल्या.
यावर्षी जूनच्या अखेरपर्यंत पावसाचे आगमन न झाल्याने शेतकरी चिंतेत होते . परंतु जुलैमध्ये पावसाचे आगमन झाल्याने मावळातील शेतीच्या कामांना वेग आला आहे . भात लागवडी देखील सुरू झाल्या आहेत . त्यामुळे शेतकऱ्यांना खते व बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देण्याच्या सुचना कृषि विभागास यावेळी आमदार शेळके यांनी केल्या .व महिला बचत गटांमार्फत महिला सक्षमीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा घेतला .तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळांची घटती पटसंख्या थांबविण्यासाठी व विद्यार्थी संख्या वाढविण्यासाठी शिक्षण विभागाने प्रयत्न करावेत , मागील दोन वर्षानंतर शाळा पुन्हा सुरू होत असल्याने शाळांमध्ये क्रिडा स्पर्धा , सांस्कृतिक कार्यक्रम तसेच शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी विविध उपक्रम राबवावेत . अशा सूचना यावेळी आमदार शेळके यांनी गटशिक्षण अधिकारी यांना केल्या.
यावेळी गटविकास अधिकारी सुधीर भागवत , सहाय्यक गटविकास अधिकारी प्रताप पाटील , तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय पडवळ , पंचायत समितिचे कृषी अधिकारी संताजी जाधव , गट शिक्षण अधिकारी बाळासाहेब राक्षे , तालुका आरोग्य अधिकारी चंद्रकांत लोहारे , तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉ . अंकुश देशपांडे आदी अधिकारी उपस्थित होते.