Thursday, September 19, 2024
Homeपुणेमावळबौर येथील स्वामी समर्थ इंग्लिश स्कुलच्या विध्यार्थ्यांचा दिंडी सोहळा संपन्न..

बौर येथील स्वामी समर्थ इंग्लिश स्कुलच्या विध्यार्थ्यांचा दिंडी सोहळा संपन्न..

पवनानगर : बौर येथील स्वामी समर्थ इंग्लिश स्कुलमध्ये दिंडी सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला . प्रि – प्रायमरी व इयत्ता 1 ली ते 6 वीच्या विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांचा पारंपारिक पोशाख परिधान करत दिंडी काढली.

कोरोना काळात 2 वर्षे दिंडीला परवानगी मिळाली नव्हती . मात्र आता मोठ्या संख्येने वारकरी समुदाय भक्ती – भावाने वारीला हजेरी लावताना दिसत आहेत . त्यामुळे लहानग्यांनी तरी का मागे रहावे.या अनुषंगाने बौर येथील स्वामी समर्थ इंग्लिश स्कुलमधील मुलांची आज दिंडी काढण्यात आली . यावेळी इयत्ता दुसरीच्या तृषांक ललित धुमाळ या विद्यार्थ्याने विठुरायाचे सावळे रूप घेऊन तर संस्कृती प्रदीप राऊत या विद्यार्थीनीने रुक्मिणीचे सुंदर साजिरे रूप व आकर्षक वेशभूषा घेऊन कार्यक्रमाची व दिंडीची शोभा आणखी खुलवली होती . तसेच पालखीची सजावटही शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी शाळेतच केली होती.

स्वामी समर्थ इंग्लिश स्कुलमधून निघालेली ही दिंडी गावातील विठ्ठल – रुक्मिणी मंदिरामध्ये विसावा घेत शिक्षिका आरती मॅडम यांनी आपल्या सुंदर अभंग गायनाने सर्व विद्यार्थी तसेच पालक वर्ग व शिक्षकांना मोहित करून मुलांना देखील अभंग म्हणायला लावले . विद्यार्थ्यांनी भजन व दिंडीची गीते सादर केली तदनंतर विद्यार्थ्यांना प्रसाद वाटप करून दिंडीची सांगता करण्यात आली.

- Advertisment -

You cannot copy content of this page