वडगांव मावळ : भारत देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मोरया महिला प्रतिष्ठान व मोरया ढोल पथकाच्या माध्यमातून वडगाव शहरवासीयांसाठी तिरंगा ध्वज वाटप या देशभक्तीपर कार्यक्रमाचा नगराध्यक्ष मयुरदादा ढोरे यांच्या उपस्थितीत उत्साही वातावरणात शुभारंभ करण्यात आला.
संपूर्ण देश ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहे. अशा या 75 व्या स्वातंत्र्य अमृत महोत्सवाचे औचित्य साधून “हर घर तिरंगा” हा ऐतिहासिक सोहळा साजरा करण्यासाठी मोरया महिला प्रतिष्ठान अध्यक्षा अबोलीताई ढोरे यांनी सर्वांना आवाहन केले.
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव शनिवार दिनांक तेरा ते सोमवार दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी दरम्यान साजरा होत असताना हा सुवर्णक्षण ऐतिहासिक करण्यासाठी मोरया महिला प्रतिष्ठान व मोरया ढोल पथक च्या माध्यमातून वडगाव व कातवी मधील रहिवाशांना शुक्रवार दिनांक 12 ऑगस्ट 2022 रोजी पर्यंत राष्ट्रध्वज विनामूल्य भेट देण्यात येणार आहे.
तरी शहरातील सर्व नागरिकांनी तिरंगा ध्वज घेऊन जावे तसेच वडगाव कातवीतील नागरिकांनी आपल्या घरावरती राष्ट्रध्वज लावून “हर घर तिरंगा” या अभियानामध्ये उत्फुर्तपणे सहभागी व्हावे याकरिता आज शहरातील विविध भागातील नागरिकांना ध्वज वाटप करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष मयुरदादा ढोरे, जेष्ठ नागरिक सेल अध्यक्ष विष्णूजी शिंदे, मोरया प्रतिष्ठान अध्यक्षा अबोलीताई ढोरे, नगरसेवक गणेश म्हाळसकर आणि मित्रपरिवार उपस्थित होते.राष्ट्रध्वज लावताना राष्ट्रध्वज संहितेचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन नगराध्यक्ष मयुरदादा ढोरे यांनी केले.