वडगाव मावळ (प्रतिनिधी) : मावळ तालुका मातंग समाजाच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची 102 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली . रविवार दि.28 रोजी वडगाव मावळ येथील पूजा गार्डन मंगल कार्यालयात महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून मिरवणूक काढण्यात आली.
यावेळी समाजातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या समाज बांधवांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले . त्यामध्ये ‘ समाजभूषण पुरस्कार ‘ , ‘ वीर फकीरा पुरस्कार ‘ व ‘ क्रांतीज्योती मुक्ता साळवे पुरस्कार ‘ देऊन समाज बांधवांना सन्मानित करण्यात आले.
यावेळी खासदार श्रीरंग बारणे , समाज भूषण अंकल सोनवणे , झोपडपट्टी सुरक्षा दलाचे अध्यक्ष भगवानराव वैराट , मावळ तालुका काँग्रेस अध्यक्ष बाळासाहेब ढोरे , किसनराव नेटके , जि . प . सदस्य नितीन मराठे , आकाश पवार इत्यादी मान्यवर उपस्थित होते .
सदर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी पंढरीनाथ आढाळगे ( सर ) , सचिन भांडे , सतीश राजगुरू , संतोष आढागळे , रामदास भांडे , तुकाराम खुडे , संतोष खिलारे , संजय शेंडगे , राजू कांबळे , शंकरराव वैरागर , अशोक बोभाटे , जयश्री गोटे , प्रवीण जाधव आदींनी विशेष परिश्रम घेतले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मण शेलार सर यांनी केले . तर आभार राजाराम अस्वरे यांनी मानले.