कामशेत (प्रतिनिधी): जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळा कामशेत येथे शिक्षक दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन दि.6 सप्टेंबर रोजी करण्यात आले होते.
कामशेत उर्दू शाळेत सालाबादप्रमाणे शिक्षक दिन साजरा करताना राष्ट्रीय मानव अधिकार सुरक्षा संघटन राज्य महामंत्री वंदना मोरे व राष्ट्रवादी काँग्रेस अल्प संख्यांक सेल नवी मुंबई विभाग, महाराष्ट्र राज्य सरचिटणीस सुलतान मालदार आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लक्षनीय होती.
शिक्षक दिनाचे औचित्य साधून शिक्षक हा मूर्ती घडविणारा असा कलाकार आहे की त्याने मूर्ती घडविल्याचे फळ तो कधीच घेत नसतो, शिक्षणा बरोबर विध्यार्थ्यांना योग्य मार्ग दाखविण्याचे कार्य शिक्षक करत असतो अशा शिक्षकांना मानवंदना देत शाळेतील पहिली ते सातवीच्या विध्यार्थ्यांनी आपापल्या पद्धतीने शिक्षकांचे महत्व पटवून देणारी गिते व प्रात्याक्षिके सादर करून प्रमुख पाहुणे व शिक्षक वर्गाला मंत्र मुग्ध केले.
यावेळी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिक्षकांनी आर्थिक नियोजनाचा विचार न करता फक्त विध्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करावा असे मत मालदार यांनी मांडले तर वंदना मोरे यांनी सर्व प्रथम डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण यांना अभिवादन करून शाळेचे आभार व्यक्त केले तसेच पालक आपल्या पाल्यांच्या भविष्याची जबाबदारी शिक्षकांवर सोपवतात,आपल्या पाल्यांनी भविष्यात काय बनायचे हे स्वप्न पालक पाहतात परंतु ते पूर्ण करण्यासाठी शिक्षकांचा सिंहाचा वाटा असतो.
आपली भारतीय संस्कृती ही संपूर्ण विश्वात नावाजली जाते कारण आपल्या देशात सर्व धर्म समभाव या परंपरे नुसार राहतात. आपणास कोणी आपापसात लढायला शिकवत नाही पण आपण आपली ही क्षमता बनवायची की आपण शिकून देशाचे उत्तम नागरिक झालो पाहिजे. अनेक विध्यार्थी उच्च शिक्षणासाठी भ्रस्टाचाराचे बळी पडत आहेत. अशा विध्यार्थ्यांसाठी आपण सर्वांनी व आम्ही आमच्या संस्था, संघटना यांच्या माध्यमातून प्रयत्न करणार असे मत त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.
यावेळी शाळेच्या वतीने मुख्याध्यापिका बिस्मिल्लाह शेख यांच्या हस्ते मान्यवरांना पुष्प गुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नादेरा शेख यांनी केले तर सय्यद मुज्जाफीर सर यांनी आभार प्रदर्शन केले.
यावेळी प्रमुख पाहुण्यांसोबत लोणावळा मुस्लिम बँकेचे चेअरमन जाकीर खलिफा, उद्योजक नितीन गायकवाड, सईद नालमांडू यांसमवेत शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षक व विध्यार्थी आदींच्या मोठया उपस्थितीत शिक्षक दिनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.