if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
तळेगाव दाभाडे (प्रतिनिधी) : मावळचे आमदार सुनील शेळके यांचे बंधू सुधाकर शेळके यांच्यासह दोघे आणि जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे व प्रवक्ते मिलिंद अच्युत या बड्या नेत्यांविरोधात तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात ‘ अॅट्रॉसिटी ‘ चे गुन्हे दाखल झाल्याने नगरपरिषदेच्या निवडणुकीपूर्वीच तळेगावमधील राजकारण तापले आहे .
पहिल्या प्रकरणात प्रवीण सिद्धार्थ ओव्हाळ ( वय 36 , रा . तळेगाव ) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार सुधाकर शेळके , मॉण्टी दाभाडे ( दोघे रा . तळेगाव दाभाडे ) यांच्याविरोधात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती 3(1) नुसार गुन्हा दाखल झाला आहे . हा प्रकार शनिवार दि.10 रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास लिंब फाटा येथे घडला.
फिर्यादीत ओव्हाळ यांनी म्हटले आहे की , माजी नगराध्यक्षा सुलोचना आवारे यांच्या वाहनावर मी चालक म्हणून कार्यरत आहे . शनिवारी रात्री दहाच्या सुमारास तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात किशोरभाऊ आवारे यांना भेटण्यासाठी गेलो होतो.ठाण्यात गर्दी असल्याने लिंब फाटा येथे थांबलो . साडे दहाच्या सुमारास सुधाकर शेळके हे पोलिसांसोबत चालत तिथे आले होते .तर , मॉन्टी दाभाडे मोटारीतून आला होता . त्यावेळी त्याने ताईचा ड्रायव्हर आहे असे म्हणत माझा जातीवाचक उल्लेख केला . तसेच सुधाकर यानेही जातीवाचक बोलत घरी जा ना , बघतो तुझ्याकडे , असे म्हणाला . तसेच पोलिसांना मला घरी जाण्यासाठी सांगण्यास सांगितले . मला सार्वजनिक ठिकाणी अपमान करण्याच्या उद्देशाने जातीवाचक शिवीगाळ करुन धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे .
तसेच दुसऱ्या प्रकरणात संदीप संजय सदावर्ते ( वय 34 , रा . तळेगाव ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार किशोरभाऊ आवारे , मिलिंद अच्युत यांच्याविरोधात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती 3(1) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हा प्रकार रविवार दि .11रोजी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या आवारातील कॅन्टीनमध्ये सांयकाळी साडे सातच्या सुमारास घडला .
सदावर्ते यांनी फिर्यादीत म्हटले आहे की , रविवारी मी सुधाकर शेळके यांच्यासोबत तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात आलो होतो . शेळके पोलीस ठाण्याच्या इमारतीत गेले असता मी कॅन्टीनच्या बाजूला थांबलो होतो . रात्री आठच्या सुमारास मिलिंद अच्युत व किशोरभाऊ आवारे हे माझ्या गाडीजवळ आले , असता मी गाडीतून खाली उतरलो . त्यावेळी किशोरभाऊ यांनी मला ‘ तू इथे का आला ‘ असे म्हणून दमदाटी व शिवीगाळ सुरु केली . मिलिंद अत्युत यांनीही शिवीगाळ केली . जातीवाचक बोलत माजलास का , बघतो तुझ्याकडे , तुमचा माज उतरवला पाहिजे असे म्हणाले.
त्यावेळी काही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून मी घरी गेलो . त्यानंतर कुटुंबियांशी चर्चा करुन पोलिसात तक्रार दिली आहे . मी सार्वजनिक ठिकाणी थांबलो असता माझा अपमान करण्याच्या उद्देशाने जातीवाचक शिवीगाळ करुन धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे . या दोन्ही प्रकरणाचा तळेगाव दाभाडे पोलीस अधिक तपास करत आहेत.