Thursday, November 21, 2024
Homeक्राईमविज कनेक्शन कट केल्याच्या रागातून महावितरण सहाय्यक अभियंत्यास मारहाण, एकावर गुन्हा दाखल...

विज कनेक्शन कट केल्याच्या रागातून महावितरण सहाय्यक अभियंत्यास मारहाण, एकावर गुन्हा दाखल…

तळेगाव (प्रतिनिधी) : घरातील विज कनेक्शन कट करून वीजपुरवठा खंडित केल्याचा राग मनात धरून थेट महावितरणच्या सहाय्यक अभियंत्यालाच बेदम मारहाण केल्याचा प्रकार तळेगाव दाभाडे येथे सोमवार दि.19 रोजी घडला . तसेच तू एफआयआर तर कर , मी नंतर येऊन तुला ठेचतो , अशी धमकी देखील आरोपीने फिर्यादी सहाय्यक अभियंत्याला दिली.

या गुन्ह्यातील आरोपी ओंकार उर्फ विकी नवघने ( वय 25 , रा . तळेगाव दाभाडे ) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी सहाय्यक अभियंता विक्रम गुलाब राठोड ( वय 39 , रा . ताथवडे ) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , फिर्यादी सहायक अभियंते विक्रम राठोड हे तळेगाव दाभाडे स्टेशन येथील महावितरणच्या शाखा – 1 येथे कार्यरत आहेत . या गुन्ह्यातील आरोपीला महिन्याभरापूर्वी चुकीचे वीजबिल आले होते . त्याला वीजबिल दुरुस्त देखील करून देण्यात आले होते . त्यावेळी त्याने महावितरणच्या कार्यालयात येऊन शिवीगाळ केली होती . दरम्यान फिर्यादी यांनी आरोपीला वीजबिल भरण्याबाबत सांगितले होते . मात्र त्याने वीजबिल भरले नव्हते . त्यामुळे महावितरणने आरोपीचे वीज कनेक्शन कट केले.

याचाच राग मनात धरून आरोपीने सोमवारी दुपारी बारा वाजताच्या सुमारास महावितरणच्या कार्यालयात येऊन सहाय्यक अभियंता राठोड यांना मारहाण केली . त्यानंतर तू एफआयआर तर कर , मी नंतर येऊन तुला ठेचतो , अशी धमकी देखील आरोपीने दिली . याबाबत सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास तळेगाव दाभाडे पोलीस करत आहेत.

- Advertisment -

You cannot copy content of this page