Thursday, July 3, 2025
Homeपुणेलोणावळालोणावळा उर्दू माध्यमिक व प्राथमिक शाळेत महिलांची हिमोग्लोबिन तपासणी शिबीर व विध्यार्थ्यांसाठी...

लोणावळा उर्दू माध्यमिक व प्राथमिक शाळेत महिलांची हिमोग्लोबिन तपासणी शिबीर व विध्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा..

लोणावळा (प्रतिनिधी) : इंटरनॅशनल लायन्स क्लब ऑफ लोणावळा डायमंड आणि एकात्मिक बाल विकास प्रकल्प पिंपरी – पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने लोणावळा नगरपरिषद उर्दू माध्यमिक व प्राथमिक शाळा भांगरवाडी येथील विध्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन व खाऊ वाटप करण्यात आले.

लायन्स क्लब ऑफ लोणावळा डायमंड व एकात्मिक बाल विकास प्रकल्प पिंपरी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात पहिली ते तिसरी पर्यंतच्या चिमुकल्यांसाठी सदृढ बालक ही स्पर्धा तर इयत्ता तिसरी ते सहावी मधील विध्यार्थ्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धा आयोजित करण्यात आली.

तसेच यावेळी महिलांसाठी मोफत हिमोग्लोबिन तपासणी शिबीर ही आयोजकांकडून राबविण्यात आले त्याचबरोबर अंगणवाडी शिक्षिकांना कापडी पर्स चे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी लायन्स क्लब ऑफ डायमंड च्या सिनियर पर्सन मेंबर सिमा शिंदे, सिनियर मेंबर विना परमार, सिनियर मेंबर राजेश अगरवाल, सिनियर मेंबर दाऊद थासरावाला, अध्यक्ष अनिल गायकवाड, सेक्रेटरी अनंता पाडाळे, खजिनदार तस्नीम थासरावाला, हेमलता शर्मा, दिपाली डोंबले, रेखा पाडाळे, सुनिता गायकवाड, वैभव गदादे, अश्विनी पवार, मनोज जयस्वाल, शंख्येश्वरी रुग्णालयाच्या नर्स अर्चना इंगवले, वैशाली अंभोरे यांसमवेत उर्दू माध्यमिक विद्यालयाचे सईद नालमांडू सर, प्राथमिक विद्यालयाचे खान लतिफ सरदार सर आणि शिक्षक वर्ग व पालक विध्यार्थी मोठया संख्येने यावेळी उपस्थित होते.

- Advertisment -

You cannot copy content of this page