if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
तानाजी बुवा काळोखे व ह. भ.प. मंगलाताई दिघे यांची भजनाची ६० वर्षांची परंपरा..
भिसेगाव – कर्जत (सुभाष सोनावणे) महाराष्ट्राची भूमी ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते .वारकरी संप्रदायाची पायारूपी मुहूर्तमेढ रोवणारे ज्ञानोबा माऊली तर संत नामदेवांच्या अभंगाने ज्ञान रुपी भिंती बांधून त्यावर कळस रुपी अज्ञानाचा अंधकार दूर करणारे संत तुकाराम महाराज यांचा महिमा शतकोन शतको आज ही या महाराष्ट्राच्या पुण्यभूमीत रुजलेले आपण पहात आहोत.
रायगड च्या छत्रपतींच्या पावन भूमीत कर्जत तालुक्यातील भजन सम्राट गजानन बुवा पाटील व दत्तात्रेय हरिभाऊ काटे गुरुजी – नेरळ यांचे निकटचे शिष्य म्हणून ज्यांनी वयाच्या ५ वर्षांपासूनच भजनाची गोडी लागून , गेली ६० वर्षे भजन गाऊन समाजात भक्तीरूपाने मैत्री – करुणा – अभंग रुपी गोड वातावरण ठेवून सर्वांनीच सुखाने रहावे , हाच संदेश सर्वत्र देणारे श्री हनुमान प्रासादिक भजन मंडळ – टाकवे या भजनी मंडळाचे सर्वेसर्वा तानाजी बुवा काळोखे तर महालक्ष्मी महिला भजनी मंडळ दहिवली – कर्जत च्या सर्वेसर्वा ह. भ.प. मंगलाताई दिघे या त्यांच्या शिष्या यांच्या भजनाने श्री महालक्ष्मी मंदिर – दहिवली , कर्जत येथे नवरात्रो उत्सावाच्या निमिताने श्री महालक्ष्मी देवीच्या मंदिरात झालेल्या भजनाने भाविक मंत्रमुग्ध होऊन गेले होते.आज दि. २६ सप्टेंबर २०२२ रोजी नवरात्र उत्सवाच्या पहिल्याच दिवशी श्री तानाजी बुवा काळोखे यांचे भजन गायनाचा कार्यक्रम श्री महालक्ष्मी मंदिर , दहिवली – कर्जत येथे आयोजित करण्यात आला होता.
आपल्याकडे असलेल्या भजन रुपी अमूल्य ठेवा गाऊन व मृदुगमणी श्री आकाश काटे – वावंजे , तर तबला वादक भूषण म्हसे यांच्या सुमधुर वादनाने जमलेला भाविक वर्ग मंत्रमुग्ध होऊन ऐकत होते . वयाच्या ५ वर्षांपासून भजनाला सुरुवात करणारे श्री तानाजी बुवा काळोखे आता वयाची ७१ वर्षे पार केली तरी अजूनही ते भजनासाठी महाराष्ट्रात मुंबई , पुणे , नाशिक , तर इतर ठिकाणी रायगड जिल्ह्यबरोबरच कर्जत तालुक्यात देखील ठिकठिकाणी सर्वदूर फिरून भजन गाताना दिसत आहेत.यावेळी या भजनाला साथ श्री हनुमान प्रासादिक भजन मंडळाचे मधुकर बुवा निमसे , रघुनाथ बुवा काळोखे , धनाजी काळोखे , तर श्री महालक्ष्मी महिला भजनी मंडळाचे ह.भ.प. मंगलाताई दिघे , कलाबाई ठाकरे , अश्विनी दिघे , शुभांगी दिघे , संगीता भोईर , सारिका बोराडे , शैला लाड , संगीता लाड , वासंती लाड , सुमन लाड , विमल लाड , सविता लाड , रमाबाई टेंबे , मुक्ताबाई लाड आदी भजन मंडळी साथ देण्यास उपस्थित होते.