लोणावळा (प्रतिनिधी) : लोणावळा शहर पोलीस स्टेशनमध्ये दि.26/9/2022 रोजी तक्रार देण्यासाठी आलेल्या फिर्यादीस पोलीस स्टेशन आवारातच मारहाण झाल्याची बातमी अष्ट दिशा न्यूज वर प्रसिद्ध करण्यात आली होती. सदर बातमीबाबत पोलीस स्टेशन ने दिलेल्या माहिती नुसार पोलीस नाईक मयूर अबणावे हे फिर्यादी आहेत.तर बातमी प्रसिद्ध करताना अष्ट दिशा न्यूज च्या काही तांत्रिक अडचणींमुळे जखमी सचिन सदानंद घोणे यांचा काहीही संबंध नसताना त्यांचे नाव फिर्यादी म्हणून प्रसिद्ध झाले त्याबद्दल अष्ट दिशा न्यूज कडून क्षमस्व.
पोलीस स्टेशन आवारात दि.26 रोजी झालेल्या भांडणात लोणावळा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक मयूर अबणावे हे भांडण सोडवत असताना जखमी झाले त्याबाबत त्यांनी पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी केतन दिपक फाटक (वय 30, रा. रचना गार्डन, लोणावळा ) याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार आरोपी केतन फाटक यांच्या विरोधात तक्रार देण्यासाठी आलेल्यांना आरोपीने लोणावळा शहर पोलीस स्टेशन ठाणे अंमलदार कक्षातून बाहेर येऊन पोलीस स्टेशन आवारात फिर्यादी व त्याच्या बरोबर असणाऱ्यास आपखुशीने लाकडी दांडक्याने मारहाण केली त्यात फिर्यादी यांच्या डाव्या हाताचा अंगठा फ्रॅक्चर झाला,तसेच भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या पोलीस नाईक हे सरकारी कर्मचारी असल्याची जाणीव असूनही आरोपी याने जाणून बुजून त्यांना धक्का देऊन खाली पाडले त्यामुळे त्यांचा पाय फ्रॅक्चर होण्यास कारणीभूत ठरल्या प्रकरणी गु.र.नं. 141/2022 भा. द. वी. कलम 353,325,324 प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करण्यात आले आहे.