Friday, November 22, 2024
Homeपुणेलोणावळास्वच्छ सर्वेक्षण अभियानात लोणावळा नगरपरिषदेचा देशात तिसरा क्रमांक..

स्वच्छ सर्वेक्षण अभियानात लोणावळा नगरपरिषदेचा देशात तिसरा क्रमांक..

उद्या होणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन पुरस्कार वितरण.प्रथम क्रमांक कराड द्वितीय क्रमांक सासवड तर लोणावळा तिसऱ्या स्थानी..

खपोली-दत्तात्रय शेडगे

स्वच्छ सर्वेक्षण अभियान 2020 मध्ये लोणावळा नगरपरिषदेने देशात तिसरा क्रमांक मिळविला आहे. मागील तीन वर्ष लोणावळा नगरपरिषदेने या स्पर्धत सहभाग घेत सलग तिन्ही वेळेस राष्ट्रीय नामांकन मिळविले आहे. उद्या ११ वाजता ऑन लाइन पद्धतीने या पुरस्काराचे वितरण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.


एक लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या 3898 आणि 50 हजार ते 1 लाख लोकसंख्या असलेल्या 544 शहरांनी या स्पर्धेत भाग घेतला होता एक लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या 3898 आणि 50 हजार ते 1 लाख लोकसंख्या असलेल्या 544 शहरांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. लोणावळा शहराचा आजमितीला लोकसंख्या 57 हजार 698 असून, बाहेरून फिरायला येणार्या पर्यटकांची दैनंदिन सरासरी संख्या 13 हजार 321 इतकी आहे. अतिशय अटीतटीच्या या स्पर्धेत लोणावळा नगरपरिषदेने तिसरा क्रमांक मिळविला. यापूर्वी 2018 साली लोणावळा नगरपरिषद सातव्या व 2019 साली दुसर्या क्रमांकावर होती

- Advertisment -

You cannot copy content of this page