देहूरोड (प्रतिनिधी) : एका महिलेवर लैंगिक अत्याचार करत मावळातील पवनानगर येथील जमीन जबरदस्तीने खरेदी करायला भाग पाडत तब्बल 66 लाखांची फसवणूक करण्यात आली .याप्रकरणी देहूरोड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
महिलेवर लैंगिक अत्याचार प्रकरणी याप्रकरणी 33 वर्षीय महिलेने गुरुवार दि .29 रोजी देहुरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार प्रदिप फक्कड कोळी ( वय 30, रा . तळेगाव दाभाडे ) व जमिनीच्या व्यवहारात समाविष्ट असलेला देवा विलास सोनवणे ( वय 32, रा . पवनानगर , ता . मावळ ) यांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , फिर्यादी यांनी फिर्यादीत म्हटले आहे की , आरोपी कोळी याने पवनानगर येथील जमीन चांगली आहे ती तुझी एफडी मोडून घे , तसेच तुझ्यात माझ्यात जे झाले ते कोणाला सांगू नको , नाही तर तुला व तुझ्या मुलीला पुढे – मागे कोणी नाही एकेदिवशी गायब करेन अशी धमकी दिली.
त्यावरून जानेवारी 2022 मध्ये शेवटच्या आठवड्यात फिर्यादी या अंकुश सोनवणे याच्या घरी गेल्या व त्यांना विचारले की मला एक जमीन दाखवली व दिली दुसरी असे का , तर हे सारे व्यवहार कोळी बघत असल्याचे सांगीतले . या कारणावरून कोळी सतत फिर्यादीच्या घरी येऊ लागला . त्याने फिर्यादीला लग्नाची मागणी घालून जबरदस्ती शारीरिक संबंध प्रस्थापीत केले.
दरम्यान जमिनीच्या व्यवहाराचा बहाणा करून आरोपींनी फिर्यादी यांच्याकडून वेळोवेळी सुमारे 66 लाख रुपये उकळले व फिर्यादी यांना जमिन न देता त्यांची फसवणूक केली . शारीरिक अत्याचार व आर्थिक फसवणूक यामुळे फिर्यादी यांना धक्का बसला होता.त्यातून मानसीक स्थिती सावरल्यानंतर त्यांनी गुरुवारी देहूरोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली . त्यानुसार पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून पोलीस पुढिल तपास करत आहेत.