मावळ (प्रतिनिधी):लायन्स क्लब ऑफ लोणावळा डायमंडच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहनिमित्त लोणावळ्यातील विविध ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
ऑक्टोबर सेवा सप्ताह निमित्त व ईद ए मिलादुन नबी चे औचित्य साधून लोणावळ्यातील दाऊदी बोहरा कब्रस्तान,ख्रिश्चन कब्रस्तान परिसर, सुन्नी मुस्लिम जमात इदगाह मस्जिद एन कब्रस्तान याठिकाणी वाढलेले गवत काढून येथील कचरा गोळा करून साफसफाई करण्यात आली यावेळी सर्व लायन सदस्य आमिल साहेब, मुर्तुजाभाई, ख्रिश्चन समुदाय आणि सुन्नी मुस्लीम जमात सदस्य उपस्थित होते तसेच लोणावळा नगरपरिषदेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचे सदर स्वच्छता मोहिमेत विशेष सहकार्य लाभले.
यावेळी लायन्स क्लब डायमंडचे अध्यक्ष लायन अनिल गायकवाड, सचिव लायन अनंता पाडाळे,लायन दाऊद थासरावाला, खजिनदार लायन तस्नीम थासरावाला,लायन हुसेन कॉन्ट्रॅक्टर, लायन अब्दुल कादिर खंडालेवाला आदी मान्यवरांसह लोणावळा नगरपरिषद स्वच्छता कामगार उपस्थित होते.