Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडकर्जत - खालापूर मतदार संघाचे कार्यसम्राट माजी आमदार व लोकनेते सुरेशभाऊ...

कर्जत – खालापूर मतदार संघाचे कार्यसम्राट माजी आमदार व लोकनेते सुरेशभाऊ लाड !

दहिवली सरपंच ते विधानभवन एक संघर्षमय राजकीय प्रवास…

भिसेगाव- कर्जत ( सुभाष सोनावणे )गेली ४० वर्षे महाराष्ट्राच्या राजकारणाबरोबरच रायगड जिल्ह्यातील कर्जत – खालापूर मतदार संघात राजकीय पटलावर आपल्या कार्याची – हजरजबाबीपणा व नेतृत्वाची छाप पाडणारे सुरेशभाऊ नारायण लाड हे बहु आयामी असामी अधिराज्य करताना दिसत आहेत . दहिवली ते ग्रामीण भागातील कानाकोप-यात त्यांचा चाहता वर्ग आजही दिसत असताना या मतदारसंघात तीनवेळा ” आमदार ” म्हणून विजयाची हॅट्रिक केलेली दिसून येत आहे . त्यांच्या या विजयात ते ” लोकनेते ” असल्याचीच छाप दिसत असून राजकीय क्षेत्रात त्यांचा असलेल्या दबदब्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार साहेबांच्या अत्यंत निकटवर्तीय म्हणून माजी आमदार सुरेशभाऊ लाड यांना मानसन्मान मिळत आहे.
आपल्या उभारत्या काळात सुरेशभाऊ राष्ट्रीय काँग्रेस मध्ये काम करत असताना दहिवली – निड येथे ” सरपंच ” पदी विराजमान झाले , मग मात्र त्यांनी आजपर्यंत केलेल्या यशस्वी राजकीय प्रवासात कधीच मागे वळून बघितले नाही . कर्जत तालुका राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष पद देखील त्यांनी भूषविले. राष्ट्रवादी  काँग्रेस पक्षाची स्थापना सन १९९९ साली झाली . त्यावेळी राष्ट्रीय काँग्रेस पक्षामधून त्यावेळेचे उभरते नेतृत्व व सन १९९२ साली कर्जत  पंचायत  समितीचे सभापती पद भूषविलेले सुरेशभाऊ लाड यांना राष्ट्रवादी काँग्रेसने तिकीट दिले असता ते विजयी होऊन आमदार झाले.
त्यानंतर सन २००४ ला ते पराभूत झाले , पुन्हा सन २००९ व २०१४ ला विजयी होऊन त्यांनी कर्जत – खालापूर मतदार संघाचे आमदार बनून तीन वेळा प्रतिनिधित्व केले .कर्जत – खालापूर मतदार संघ अध्यक्ष , रायगड जिल्हाध्यक्ष अशी महत्वाची पक्षाची पदे देखील त्यांनी भूषविली आहेत.कर्जत – खालापूर मतदारसंघात विकास कार्य करून त्यांनी आजपर्यंत येथील चेहरा मोहरा बदलला आहे.या मतदार संघाचे राजकारण आजही त्यांच्या नावाभोवती घोंघावताना दिसत आहे . रायगडचे राजकीय भीष्मांचार्य खासदार सुनील तटकरे व त्यांची ” राजकीय दोस्ती ” सर्वश्रुत आहेच तर अजितदादा पवार यांचे ही ते चांगले मित्र आहेत . राजकीय क्षेत्रात आजपर्यंत ज्यांच्या कपाळी त्यांनी राजकीय गुलाल लावला त्यांची राजकीय कारकीर्द निवडून आणून बदलली आहे.
त्यांनी अनेक ग्रामपंचायत सदस्य , पंचायत समिती सदस्य , जिल्हा परिषद सदस्य निवडून आणून आजही तरुणांच्या गळ्यातील ते ताईत बनून अधिराज्य करत आहेत. सन २०१९ साली त्यांचा झालेला पराभव अनेकांच्या वर्मी लागला असून त्याची परतफेड पुन्हा एकदा विजय हासिल करू , असे म्हणणारे अनेक कार्यकर्ते पुढील निवडणुकीची वाट पहात आहेत .राजकीय क्षेत्रात राजकीय पटलावर चमकणारा धुरंधर नेता म्हणून त्यांची वाटचाल यशस्वीपणे पार करत येणाऱ्या काळात ते कर्जत – खालापूर मतदार संघातून पुन्हा आमदार म्हणून विजयी होऊन विजयोत्सव साजरा करो , अश्याच आजच्या या त्यांच्या ६६ व्या वाढदिवशी त्यांना खूप – खूप मनःपूर्वक शुभेच्छा !
- Advertisment -

You cannot copy content of this page