Friday, September 20, 2024
Homeपुणेमावळऐतिहासिक कार्ला नगरीला इंग्लंडच्या शिष्ट मंडळाची भेट..

ऐतिहासिक कार्ला नगरीला इंग्लंडच्या शिष्ट मंडळाची भेट..

कार्ला (प्रतिनिधी) : मावळ तालुक्यातील ऐतिहासिक कार्ला नगरीला इंग्लडच्या पंधरा जणांच्या शिष्टमंडळाने भेट दिली .
कार्ला येथे 1779 मध्ये झालेल्या इंग्रज आणि मराठ्यांच्या लढाईत मारला गेलेल्या इंग्रज सेनापतीच्या स्तंभाची पाहणी केली . तसेच त्या काळात घडलेल्या ऐतिहासिक घटनेविषयी माहीती घेतली . विकिपीडियावरून मिळालेल्या माहितीनुसार , 4 जानेवारी 1779 रोजी कार्ला येथील ऐतिहासिक तलावाकाठी असलेल्या शंभु महादेवाचा अर्शिवाद घेऊन , हर हर महादेवाचा गजर करत मराठे आणि इंग्रज यांच्यात मोठी लढाई झाली होती .
कार्ला या ठिकाणी गनिमी काव्याने लढलेल्या या लढाईत मराठ्यांचा मोठा विजय झाला आणि या लढाईत इंग्रजांचा कथित सेनापती जेम्स स्टुअर्ट ( इस्टुर फाकडा ) मुख्य लढाईच्या 10 दिवस आधीच कार्ल्यात महादजी शिंदेंच्या फौजेकडून मारला गेला .
कार्ला येथील ऐतिहासिक तळ्याकाठी स्टुअर्ट फाकड्डांचा स्तंभ आहे . या सर्व ऐतिहासिक घटनेची इंग्लंडच्या दप्तरी नोंद असून त्याची साक्ष या शिष्टमंडळाने या ठिकाणी भेट दिल्याने पाहण्यास मिळाली .
यावेळी कार्ला ग्रामपंचायतीचे माजी सदस्य भाऊसाहेब हुलावळे यांनी शिष्टमंडळाचे स्वागत केले . या शिष्टमंडळात इंग्रज सेनादलाचे माजी कर्नल पॅट्रीक्स हे देखील सामील होते . तसेच शिष्टमंडळातील सदस्यांनी स्मित हस्याने समाधान व्यक्त केले . यावेळी इतिहास अभ्यासक नितिन शास्त्री यांनी कार्ला येथील ऐतिहासिक लढाईची माहीती तसेच पुढील पिढीला देशात इंग्रजांबरोबर झालेल्या सर्वात मोठ्या लढाईचा व या लढाईत मराठ्यांचा सर्वात मोठा विजय झाला होता , याचे कायम स्मरण राहवे या करीता या ठिकाणी उभा राहत असलेल्या विजयस्तंभाविषयी माहीती सांगितली.
- Advertisment -

You cannot copy content of this page