कार्ला(प्रतिनीधी) : कोजागिरी पौर्णिमेनिमित्त कार्ला येथे महालक्ष्मी आईची मिरवणूक वाजतगाजत आनंदात पार पडली.
सालाबादप्रमाणे यंदाही कार्ला ग्रामस्थ व महिलांच्या असंख्य सहभागाने आई महालक्ष्मी ची मिरवणूक गावात प्रदक्षिणा घालत वाजत गाजत भक्तिमय वातावरणात संपन्न झाली. यावेळी कार्ला गावातील सर्व पदाधिकारी ग्रामस्थ व महिला मोठया संख्येने उपस्थित होते.
यावेळी कोजागिरी पौर्णिमेची आई महालक्ष्मी च्या मिरवणूकीची सांगता झाल्यानंतर सायंकाळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गावातील सर्व पुरुष महिला व लहानांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.