Friday, November 22, 2024
Homeपुणेमावळनिवडणूक चिन्ह मशाल पेटवून आई एकविरा गडावर शिवसैनिकांचा आनंदोस्तव...

निवडणूक चिन्ह मशाल पेटवून आई एकविरा गडावर शिवसैनिकांचा आनंदोस्तव…

कार्ला (प्रतिनिधी): निवडणुक आयोगाकडून शिवसेनेला अंधेरी पोटनिवडणुकीसाठी मशाल चिन्ह व पक्षाचे नाव म्हणून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) देण्यात आल्याने आज दि. 11 रोजी कार्ला एकविरा गडावर मशाल पेटवून अनंदोत्सव साजरा करण्यात आला.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी आज शिवसेनेचे नवनिर्वाचित शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुरेश गायकवाड व शिवसेना मावळ तालुका प्रमुख आशिष ठोंबरे यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे कुटुंबीयांचे कुलदैवत कार्ला गडावर आई एकवीरा देवीचे दर्शन करुन देवीच्या चरणी मशाल पेटवून मशालीची विधीवत पुजा करण्यात आली.
यावेळी शिवसेना महिला आघाडी सहसंपर्क संघटीका माजी नगरसेविका शादान‌ चौधरी, युवासेना पुणे जिल्हा अधिकारी अनिकेत घुले, लोणावळा शहरप्रमुख बाळासाहेब फाटक, उपतालुकाप्रमुख मदन शेडगे, शहरसंघटिका नगरसेविका कल्पना आखाडे, नगरसेवक शिवदास पिल्लै, उपशहरप्रमुख संजय भोईर, मनेष पवार, विभाग प्रमुख अशोक निकम, शहर सल्लागार रामभाऊ थरकुडे, विभाग संघटक उमेश गावडे, विभाग संघटक सोमनाथ कोंडे, विभाग संघटक एकनाथ जांभूळकर, विभाग प्रमुख काळु हुलावळे, अवजड वाहतूक सेना पुणे जिल्हा संघटक नरेश काळवीट, सरपंच बबन खरात, विभाग प्रमुख भगवान देशमुख, मंगेश येवले, युवासेनेचे निखिल येवले, अक्षय येळवंडे, शाखा प्रमुख जितेंद्र ठोंबरे, गणेश वाडकर, धीरज घारे, शंकर वाजे, नितीन म्हसकर, शिवाजी गाडे, रूपेश आंबेकर, महिला आघाडी सहसंघटिका मनिषा भांगरे, सुरेखा देवकर, अनिता गायकवाड, सीमा दिघे, मार्गारेट मुन्ना स्वामी,रोशनी जगताप , कमलेश गाढवे तसेच शिवसेना,युवासेना, महिला आघाडी, वाहतूक सेना व सर्व आजी माजी पदाधिकारी नगरसेवक शिवसैनिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.
- Advertisment -

You cannot copy content of this page