Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडकर्जतमध्ये भिसेगाव येथे फातिमा मातेची ८७ वी तीर्थयात्रा १६ ऑक्टोबर रविवारी होणार...

कर्जतमध्ये भिसेगाव येथे फातिमा मातेची ८७ वी तीर्थयात्रा १६ ऑक्टोबर रविवारी होणार साजरी…

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) सालाबादप्रमाणे यावर्षीही फातिमा मातेची ८७ वी तीर्थयात्रा रविवार दि . १६ ऑक्टोबर २०२२ रोजी येत आहे . या फातिमा मातेच्या तिर्थयात्रेस महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन तर मुंबई – उपनगरे , नाशिक , पुणे , ठाणे , वसई , विरार , भाईंदर , कल्याण , तसेच कर्जत तालुक्याच्या परिसरातून भाविक मातेच्या दर्शनाला उपस्थित रहातात . आज मनुष्य शांतीसाठी धडपडत आहे.जगामध्ये अशांततेचे वारे वहात आहेत.अनेक आजार डोके वर काढत आहेत , अनेक कुटुंब उध्वस्त होत आहेत.अशा पार्श्वभूमीत फातिमा मातेचा १०० वर्षांपूर्वी दिलेला त्याग – प्रायश्चित्त – व शांतीचा संदेश उपयुक्त ठरत आहे.

१३ मे १९१७ ह्या मंगल दिवशी पोर्तुगाल मधील फातिमा या खेडेगावात तीन मेंढपाळ मुलांना येशू देवपुत्राची माता, निष्कलंक कुमारी मारिया मातेचे दर्शन घडले . ल्युसिया , जसीता , व फ्रान्सिको अशी मेंढपाळ मुलांची नावे, ह्या मुलांना शुभ्र वस्त्रे परिधान केलेली ओक वृक्षावर तरंगत असलेली चमकदार ढगांवर आरूढ झालेली ” मारिया मातेने ” दर्शन दिले . तिच्या उजव्या हातात पांढऱ्या मण्यांची रोझरी होती . त्या तीन मुलांना ती म्हणाली , मुलांनो तुम्ही घाबरू नका , मी स्वर्गातून खाली आलेली आहे , प्रत्येक महिन्याच्या १३ तारखेला तुम्ही याच ठिकाणी मला भेटायचे , ऑक्टोबर महिन्यात मी कोण आहे ते सांगेन , १३ ऑक्टोबर १९१७ ह्या दिवशी पवित्र मारियेने फातिमा या गावी मुलांना दर्शन देऊन सांगितले की , मी रोझरी माता आहे.
विश्वासू व श्रद्धावान लोकांनी त्यांचे जीवन श्रद्धावान बनवावे , अगोदरच सर्वांनी पापे करून परमेश्वराला दुखावले आहे.अजून वाईट कृत्यांची त्यात भर घालू नये.म्हणून नियमित रोझरीची प्रार्थना करावी , असा संदेश दिला.या मातेचा महिमा सर्वदूर पसरला.दमण प्रांतातील तत्कालीन पोर्तुगीजांवर कर्जतच्या ख्रिस्ती मिशन कार्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती.त्यांनी कर्जतचा विभाग फातिमा मातेला समर्पित केला . सन १९२० मध्ये पोर्तुगाल मधून फातिमा मातेची सुबक व आकर्षक लाकडी मूर्ती कर्जत येथे आणण्यात आली.
व १९३५ साली कर्जतच्या स्टेशन शेजारी मातेचे चर्च बांधण्यात आले . तेथे फातिमा मातेला स्थानापन्न व प्रतिष्ठापना करण्यात आली . म्हणूनच दरवर्षी १३ ऑक्टोबर नंतर येणाऱ्या रविवारी फातिमा मातेची तीर्थयात्रा येथे भरते . संपुर्ण दिवसभर मातेची स्तुती , आराधना , मिस्सा , प्रार्थना , अर्चना , भजन , कीर्तन , व भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात येते . तसेच सहभोजन व प्रसादाची व्यवस्था करण्यात येते . मात्र गेली दोन वर्षे कोरोना काळ असल्याने फातिमा मातेची तीर्थयात्रा येथे झाली नाही . तर गेल्यावर्षी नियम शिथिल केल्याने कोरोना नियमांचे पालन करून भाविकांना फातिमा मातेचे दर्शन झाले होते , मात्र यावर्षी फातिमा मातेची तीर्थयात्रा मोठ्या उत्साहात साजरी होणार असल्याने भाविकांत आनंद पसरला आहे.
या फातिमा माता चर्चचे फादर लुईस कजार येथे राहून फातिमा मातेची मनोभावे सेवा करत आहेत .तर फादर ऑलविन – डॉन बास्को , वेणगाव हे येथे प्रवचन करत असतात.फातिमा मातेचे दर्शन घेण्यास येण्याचे विल्सन पानपाटील , पॉल फ्रान्सिस , व्हिक्टर अंकल , सिल्व्हेस्टर फ्रान्सिस , नेल्सन फ्रान्सिस , तम्मा आंती , सैरिओ , येशूदास , ऐग्निस , जेनिफर फ्रान्सिस , साधना पानपाटील , सिलोमीना , रिटा , संगीता भोईर , ऍड.डिमेलो , आदींनी भक्तिभावाने आमंत्रण केले आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page