Thursday, September 19, 2024
Homeपुणेमावळभाजपा व जैन प्रकोष्ठ महाराष्ट्र यांच्या वतीने आयोजित कर्करोग तपासणी शिबिरास उत्स्फूर्त...

भाजपा व जैन प्रकोष्ठ महाराष्ट्र यांच्या वतीने आयोजित कर्करोग तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद…

मावळ (प्रतिनिधी) : वडगाव मावळ येथे आयोजित कॅन्सर तपासणी शिबिरात 140 नागरिकांची तपासणी करण्यात आली.
भारतीय जनता पार्टी , जैन प्रकोष्ठ महाराष्ट्र प्रदेश यांच्या माध्यमातून आणि भारतीय जनता पार्टी वडगाव शहर यांच्या वतीने मोफत कर्करोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते . सदर शिबिराचे उद्घाटन मावळ तालुका भाजपा अध्यक्ष रविंद्र भेगडे यांच्या हस्ते आणि मावळ तालुका भाजपा प्रभारी भास्करराव म्हाळसकर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच वडगाव शहर भाजपा अध्यक्ष अनंता कुडे , संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक शिवाजीराव टाकवे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले .
याप्रसंगी डॉ.लता राघव , डॉ . मनोज पाटील , लॅब टेक्निशियन सिंह , शितल काकरे आदींनी या शिबिरात सहभागी झालेल्या नागरिकांच्या तपासण्या केल्या .या शिबिरामध्ये AIJMF चे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी , भाजपा जैन प्रकोष्ठचे प्रदेश प्रमुख संदीप भंडारी यांच्या माध्यमातून आणि स्वप्नील शहा , गिरीश पारख ,डॉ.योगेश पाटणी यांच्या समन्वयातून मा . नगरसेवक भूषण मुथा यांच्या विशेष प्रयत्नांतून अत्याधुनिक मोबाईल डिटेक्शन बसमध्ये मॅमोग्राफी , पॅप्समेयर , डिजिटल एक्सरे या सेवेद्वारे गर्भाशयाचा , स्तनाचा , प्रोस्टेट , तोंडाचा आणि ब्राँकोयटीस कॅन्सर अश्या विविध प्रकारच्या कॅन्सरच्या हजारो रुपयांच्या तपासण्या मोफत करण्यात आल्या.
यावेळी श्री.पोटोबा देवस्थान संस्थानचे मुख्य विश्वस्त सोपानराव म्हाळसकर , मा . सभापती गुलाबराव म्हाळसकर , ज्येष्ठ नेते सोपानराव ढोरे , अरविंद पिंगळे , बाळासाहेब कुडे , ॲड. तुकाराम काटे , अखिल भारतीय वारकरी मंडळ वडगावचे अध्यक्ष नारायणराव ढोरे , वडगाव विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक किसनराव भेगडे , गोपाळराव भिलारे , दिपक बवरे , सुरेश भंडारी , मावळ विचार मंचाचे अध्यक्ष सुदेश गिरमे , वसंतराव भिलारे , सोमनाथ काळे , दिपक पवार , नंदकिशोर गाडे , बारकू खांदवे , मा . उपसभापती नगरसेवक प्रवीण चव्हाण , कार्याध्यक्ष व मा . नगरसेवक प्रसाद पिंगळे , संघटनमंत्री किरण भिलारे , गटनेते दिनेश ढोरे , मा . सरपंच नितीन कुडे , सरचिटणीस मकरंद बवरे , नगरसेवक दिलीप म्हाळसकर , नगरसेवक किरण म्हाळसकर , नगरसेवक श्रीधर चव्हाण , वडगाव विविध कार्यकारी सोसायटीचे व्हाईस चेअरमन निलेश म्हाळसकर , महिला मोर्चा अध्यक्षा धनश्रीताई भोंडवे , खंडूशेठ भिलारे , रविंद्र म्हाळसकर , शरद मोरे , प्रसिद्धीप्रमुख अमोल ठोंबरे , बाळासाहेब भिलारे , मोरेश्वर पोफळे , प्रमोद म्हाळसकर , शंकरराव भोंडवे , महेश ब . म्हाळसकर , हरीश दानवे , महेंद्र बा . म्हाळसकर , शेखर वहिले , महेंद्र अ . म्हाळसकर , सचिन कराळे , आकाश म्हाळसकर , अरुण सुळके आदी उपस्थित होते .
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे यांनी आपल्या मनोगतात या उपक्रमाचे कौतुक करत मावळ तालुका कॅन्सरमुक्त व्हावा असे मत व्यक्त केले . भाजपा शहराध्यक्ष अनंता कुडे यांनी आपल्या मनोगतात नागरिकांनी स्वतःहुन आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले . वडगांव नगरपंचायतीचे मा . नगरसेवक भूषण मुथा यांनी प्रास्ताविक केले ज्यात त्यांनी या उपक्रमाची माहिती दिली . सूत्रसंचालन सरचिटणीस कल्पेश भोंडवे यांनी केले . आभार प्रदर्शन युवा मोर्चा अध्यक्ष विनायक भेगडे यांनी केले . तर नागरिकांनी या अभिनव आणि अत्यावश्यक उपक्रमाबाबत समाधान व्यक्त केले.
- Advertisment -

You cannot copy content of this page