![]()
if(isset($image4)); {?>
![]()
} ?>
if(isset($image5)); {?>
![]()
} ?>
लोणावळा (प्रतिनिधी): आदिवासी भटका बहुजन संघटना महाराष्ट्र राज्य च्या वतीने आदिवासी समाजाच्या विविध मागण्यासाठी लोणावळा नगरपरिषदेवर धडक मोर्चा काढण्यात आला.
आदिवासी भटका बहुजन समाज महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष माऊली सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली खंडाळा, ठाकुरवाडी येथील आदिवासी व स्थानिक ग्रामस्थांच्या विविध प्रश्नांतर लोणावळा नगरपरिषदेवर धडक मोर्चा गुरुवार दि .20 रोजी काढण्यात आला.
खंडाळा ठाकुरवाडी येथील आदिवासी बांधवांसाठी सार्वजविक रस्ता , आरोग्य , सार्वजनिक वीज , पाणी , सार्वजनिक स्वच्छता, डंपीग गाडी,शबरी घरकुल पर्यटन स्थळ व बोट क्लब खंडाळा येथे स्थानिकांचे हक्काचा रोजगार , सार्वजविक शौचालय आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात अशा मागण्या यावेळी आदिवासी बांधवांकडून करण्यात आल्या. त्याबाबतचे निवेदन लोणावळा नगरपरिषदेला देण्यात आले.यावेळी असंख्य आदिवासी बांधवांच्या उपस्थित संस्थापक माऊली सोनवणे, परेश बडेकर, आशिष ठोंबरे, महेश येवले यांसह इतर कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
या आदिवासी समाजाला न्याय मिळणार का ? लोणावळा नगरपरिषद याची दखल घेऊन आदिवासी समाजाच्या मागण्या कितपत पूर्ण करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.