Thursday, November 21, 2024
Homeपुणेमावळदेवीदेवतांचे फोटो असलेले फटाके विक्रीसाठी ठेवू नये, हिंदू समिती कामशेतच्या वतीने दुकानदारांना...

देवीदेवतांचे फोटो असलेले फटाके विक्रीसाठी ठेवू नये, हिंदू समिती कामशेतच्या वतीने दुकानदारांना पत्र…

मावळ (प्रतिनिधी) – हिंदू देवदेवतांचे फोटो असलेले फटाके विक्रीसाठी दुकानात ठेऊ नये यासाठी हिंदू समिती कामशेतच्या वतीने प्रत्येक फटाके विक्री करणाऱ्या दुकानदार मालकास अवाहन करत विनंती पत्र देण्यात आले.
देशातील मोठी फटाके विक्री कंपनी अनिल फायर वर्क्स व इतर फटाके उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना लवकरच लेखी निवेदन देण्यात येणार असून तरी कोणत्याही फटाका स्टॉलवर हिंदू देवदेवतांचे फोटो असलेले फटाके विक्रीसाठी ठेऊ नये कारण लक्ष्मी मातेचे फोटो असलेले फटाके फोडल्यानंतर आपल्या हिंदू देव देवतांच्या फोटोचे तुकडे तुकडे होतात व नंतर पायदळी तुडवले जातात एक प्रकारे आपल्या देवदेवतांची अवहेलना होत आहे .
काही दुकानदार मालकांनी पत्र मिळताच दिलेली फटाक्यांची ऑर्डर कॅन्सल केली . यावेळी हिंदू समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
- Advertisment -

You cannot copy content of this page