if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
भिसेगाव- कर्जत ( सुभाष सोनावणे ) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष , मराठी बाणा , मराठी संस्कृती यांचे जतन करणारे , मराठी हृदय सम्राट , छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांवर चालणारे मा.राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात मनसे ची पाळेमुळे सर्वदूर पसरली असून रायगड जिल्हाध्यक्ष जितेंद्रदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाने जिल्ह्यात पक्ष संघटना वाढत असताना आज कर्जत – खालापूर मतदार संघाच्या ” विधानसभा सचिव ” पदी कर्जत नगर परिषदेचे मा. नगरसेवक धनंजय दुर्गे यांची नियुक्ती दस्तुरखुद्द मा.राजसाहेब ठाकरे यांनी दि. २१ ऑक्टोबर २०२२ रोजी केली.
मा. नगरसेवक धनंजय दुर्गे हे कर्जत तालुक्यातील मनसेची स्थापना झाली तेंव्हापासून एकनिष्ठ मनसे सैनिक आहेत .आजपर्यंत कर्जत तालुक्यात मनसे तर्फे राबविण्यात आलेल्या कार्यक्रमात , रस्ते आंदोलन , क्रोध मोर्चे , निषेध धरणे , संतापजनक जाब बैठका , वीज प्रश्न , पाणी प्रश्न , कोरोना काळात खाजगी बँकेचे हफ्ता प्रकरण ,यात नेहमीच पुढे राहून गरीब – गरजू नागरिकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे . कर्जत शहरातील विकास कामांविरोधात आवाज उठवून प्रशासनाचे नेहमीच लक्ष वेधले आहेत . त्यांच्या या आक्रमक पवित्रामुळेच त्यांना मनसे ने स्वीकृत नगरसेवक म्हणून कर्जत नगर परिषदेवर पालिकेतील मित्रपक्षांकडे नाव देऊन नगरसेवक केले होते.
या त्यांच्या नगरसेवक पदाच्या कार्यकिर्दीत त्यांनी आपल्या प्रभागाबरोबरच शहरातील विकासाबद्दल आवाज उठवून अनेक कामे करवून घेतली आहेत .मनसे अध्यक्ष तथा मराठी हृदय सम्राट मा.राजसाहेब ठाकरे यांचे नेहमीच आदेशाचे पालन करणारे कर्जत तालुक्यातील डॅशिंग नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे मा.नगरसेवक धनंजय दुर्गे यांच्या कार्यावर खुश होऊन पक्ष संघटना वाढीसाठी त्यांच्यावर कर्जत – खालापूर मतदार संघाच्या ” विधानसभा सचिव ” पदाची धुरा मा.राजसाहेब ठाकरे यांनी सोपविली आहे . त्यांच्या या निवडीचे पक्षात जल्लोष्यात स्वागत होत असून सर्व क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे .