Friday, September 20, 2024
Homeपुणेमावळआदित्य ठाकरे यांनी घेतले कुलदैवत एकविरा देवीचे दर्शन...

आदित्य ठाकरे यांनी घेतले कुलदैवत एकविरा देवीचे दर्शन…

कार्ला (प्रतिनिधी) : राज्याचे माजी पर्यटनमंत्री व शिवसेना नेते अदित्य ठाकरे यांनी आज कुलदैवत कार्ला गडावर एकविरा देवीचे दर्शन घेतले.आज दुपारनंतर आदित्य ठाकरे कार्ल्यात पोहोचले . यावेळी त्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर उत्तर देताना शिंदे – फडणवीस सरकारचा चांगलाच समाचार घेतला. यावेळी ठाकरे म्हणाले , आताचे सरकार हे घटनाबाह्य हात पाय मारुन बसवलेले सरकार आहे . त्यांचे जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष नाही . त्यामुळे महाराष्ट्रातील मोठ – मोठे प्रकल्प गुजरातला आहेत.
मंत्रिमंडळाचे देखील लक्ष नाहीये. त्यामुळे संपूर्ण मंत्रिमंडळानेच राजीनामा द्यावा , अशा शब्दात ठाकरेंनी सुनावले तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना मदत करा . केवळ घोषणा करू नका , नाही तर मदत करता का जाता ? असा प्रश्न शेतकरी विचारत असून महाराष्ट्राशी खोटं बोलू नका , तुम्हाला जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही , असा इशारा त्यांनी यावेळी दिला .
तसेच आई एकविरादेवी विकासकामांसाठी आमच्या महाविकास आघाडी सरकारने अनेक कोटींच्या विकासकामांना मंजूरी दिली . त्यामध्ये प्रामुख्याने रोपवे व विविध विकासकामे अगदी टेंडरपर्यंत पोहचवली . परंतू आताच्या घटनाबाह्य सरकारने त्याला स्थगिती दिली असल्याचे ठाकरेंनी ठाकरे म्हणाले.
यावेळी पुणे जिल्हा संपर्क प्रमुख व आमदार सचिन आहिर , पुणे शिवसेनेचे संघटक मच्छिंद्र खराडे , पुणे उपजिल्हाप्रमुख सुरेश गायकवाड , तालुका प्रमुख अशिष ठोंबरे , पुणे जिल्हा युवासेना अधिकारी अनिकेत घुले , संघटक भारत ठाकूर , लोणावळा शहर प्रमुख बाळासाहेब फाटक , उपतालुका प्रमुख राम सावंत , मदन शेडगे , विजय तिकोणे , विजय देशमुख , संजय भोईर , अनंता हुलावळे , शुभम गायकवाड , हिंदुराज कोंढभर यांच्यासह शिवसेना , युवासेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान , मावळ शिवसेना , एकविरा देवस्थान व वेहरगाव – दहिवली ग्रामपंचातीच्या वतिने संदिप देवकर , शरद कुटे , नवनाथ देशमुख , विजय देशमुख , मंगेश गायकवाड , बाळासाहेब गायकवाड , मंगेश देशमुख , संदिप देशमुख यांनी देवीचा प्रसाद व फोटो देऊन अदित्य ठाकरे यांचा सन्मान केला.
- Advertisment -

You cannot copy content of this page