Thursday, November 21, 2024
Homeपुणेपुणे ग्रामीणचे नवनिर्वाचित पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी स्वीकारला पदभार...

पुणे ग्रामीणचे नवनिर्वाचित पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी स्वीकारला पदभार…

पुणे : डॅशिंग आयपीएस अधिकारी अंकित गोयल यांनी पुणे जिल्हा ग्रामीणचे मावळते पोलीस अधीक्षक डॉ . अभिनव देशमुख यांच्याकडून आज रविवारी ता .30 रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास पदभार स्वीकारला आहे .
अंकित गोयल यांनी इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकीची पदवी घेऊन भारतीय पोलीस सेवेत 13 फेब्रुवारी 2012 रोजी रुजू झाले . तरुण पोलीस अधिकारी अंकित गोयल यांच्याकडे अवघ्या आठ वर्षांच्या सेवेनंतर गडचिरोलीसारख्या महत्त्वाच्या जिल्ह्याची धुरा आली . अंकित गोयल यांनी गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक म्हणून 28 सप्टेंबर 2020 रोजी पदभार घेतला .
वंचित घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी विशेष उपक्रम सुरू केला .या काळात अंकित गोयल यांनी नक्षलवाद्यांच्या चकमकींमध्ये 27 वर्षांपासून पोलिसांना हुलकावणी देणारा नक्षल नेता मिलिंद तेलतुंबडेसह 54 नक्षलवादी मारले गेले . दोन वर्षात 44 जणांना अटक करण्यात यश आले . 12 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले . त्यामुळेच गडचिरोलीत सेवा देणाऱ्या 42 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शौर्य पदक , 3 जणांना शौर्यचक्र तर 2 जणांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पदक ऑगस्ट २०२२ मध्ये जाहीर करण्यात आले.
एवढ्या संख्येने एका जिल्ह्यात एकावेळी शौर्य पदक जाहीर होणारा गडचिरोली हा पहिलाच जिल्हा ठरला . या कामगिरीत गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या कामगिरीचा मोठा वाटा आहे.
अंकित गोयल यांनी नक्षलवाद्यांचे विविध सामाजोपयोगी उपक्रम राबविले . यामध्ये आत्मसमर्पित पुनर्वसन , 16 आत्मसमर्पितांचा सामूहिक विवाह , दुर्गम भागातील लोकांना सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी ‘ पोलीस दादालोरा खिडकी ” , अर्थात ‘ पोलीस दादाची खिडकी ‘ उपक्रम , 21 हजार नागरिकांना विविध योजनांचा लाभ , दोन हजार युवांना विविध क्षेत्रात रोजगार , असे अनेक उपक्रम त्यांनी केले.
दरम्यान , आगामी काही महिन्यात पुणे महानगरपालिकेच्या आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार आहेत . त्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कायदा आणि सुव्यवस्था टिकून ठेवण्यासाठी अंकित गोयल यांच्यासमोर मोठे आव्हान असणार आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page