लोणावळा (प्रतिनिधी): भारताचे पहिले गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने ‘ राष्ट्रीय एकता दौड’चे आयोजन करून राष्ट्रीय एकात्मता दिवस साजरा करण्यात आला.
आयोजित राष्ट्रीय एकता दौड सकाळी 8.00 वाजता शेतकरी पुतळा चौक येथून सुरू करण्यात आली तर नगरपरिषद कार्यालय येथे 8.30 वाजता सांगता करण्यात आली.संपूर्ण देशात एकता व बंधुत्व राहावे यासाठी देशभरात या एकता दौड चे आयोजन करण्यात आले आहे.
लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने शेतकरी पुतळा ते लोणावळा नगरपरिषद कार्यालय दरम्यान घेण्यात आलेल्या या दौडमध्ये मुख्याधिकारी पंडित पाटील , माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव , माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी आदी मान्यवरांसह लोणावळा नगरपरिषदेचे अधिकारी , कर्मचारी वर्ग तसेच पत्रकार व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता . रॅलीच्या समारोप प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरदार वल्लभभाई पटेल तसेच देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांना त्यांच्या जयंती निमित्त पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.