![]()
if(isset($image4)); {?>
![]()
} ?>
if(isset($image5)); {?>
![]()
} ?>
चाकण (प्रतिनिधी) : चाकण औद्योगिक वसाहतीमधील निघोजे येथील महिंद्रा लॉजिस्टिक लि.मधील कामगारांना 12 हजार 800 रुपयांची पगारवाढ मिळाली आहे . चाकण औद्योगिक पट्टयात लॉजिस्टिक उद्योग क्षेत्रातील आतापर्यंतची सर्वाधिक पगार वाढ असून , ऐन दिवाळीत कामगारांना ‘ विंटर गिफ्ट ‘ मिळाले आहे .
महिंद्रा लॉजिस्टिक लि . व स्वाभिमानी श्रमिक कामगार संघटना यांच्यामध्ये झालेल्या दुसऱ्या वेतनवाढ करारावर संघटनेचे प्रमुख सल्लागार आमदार महेश लांडगे , रोहिदास गाडे , महिंद्रा कंपनीचे उपाध्यक्ष विजय नायर , उद्योजक संतोष शिंदे , अध्यक्ष जीवन येळवंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वाक्षरी करण्यात आली. आमदार लांडगे यांनी कंपनी व्यवस्थापन आणि कामगार संघटना यांच्यात योग्य मध्यस्थीने कामगारांना न्याय दिला आहे. घोषणा होताच कामगारांनी डिजेच्या तालावर नाचून , पेढे वाटून फटाक्याची अतिषबाजी करुण आनंद व्यक्त केला.
कामगारांना मिळालेले लाभ पुढीलप्रमाणे : कामगारांना मिळवून दिलेल्या सर्व सुविधांच्या व्यतिरिक्त1) एकूण पगारवाढ : 12,800 / – ( बारा हजार आठशे रुपये ) 2)कराराचा कालावधी 01 / 09 / 2022 ते 28/02/2026 या साडेतीन वर्षांचा राहील .3)मागील सर्व फरक कामगारांना देण्याचे मान्य केले आहे .
यावेळी संघटनेचे सल्लागार किसन बावकर , सरचिटणीस कृष्णा रोहोकले , चिटणीस रघुनाथ मोरे , उपाध्यक्ष शामभाऊ सुळके , खजिनदार अमृत चौधरी , संघटक तेजस बिरदवडे , दत्तात्रय गवारे , भट्ट पाटील , युनिट अध्यक्ष प्रशांत पाडेकर , व्यवस्थापनाच्या वतीने महिंद्रा कंपनीचे व्हाइस प्रेसिडेंट प्रसन्ना पहाडे , एडविन लोबो , व्हाइस प्रेसिडेंट एच . आर . हेड प्रदीप झोटिंग , जोगिंदर सिंग , सुनील धानोरकर , श्रेयस आचार्य , शेखर करंजीकर , जनरल मॅनेजर ऑपरेशन हेड मुकेश कपूर , जनरल मॅनेजर एच . आर सतीश परब , डेप्युटी जनरल मॅनेजर एच.आर धीरज सिंह यांनी करारावर स्वाक्षरी केल्या आहेत . कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रदीप झोटिंग यांनी केले , व सूत्रसंचालन पुजा थिगळे यांनी केले . सरचिटणीस कृष्णा रोहोकले यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले आणि धीरज सिंह यांनी कार्यक्रमाचा समारोप केला.