Friday, October 18, 2024
Homeपुणेलोणावळासौ अनुजा संजय अडसूळे यांच्या सेवानिवृत्ती समारंभा निमित्त कवी संमेलनाचे आयोजन…

सौ अनुजा संजय अडसूळे यांच्या सेवानिवृत्ती समारंभा निमित्त कवी संमेलनाचे आयोजन…

लोणावळा(प्रतिनिधी): उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग वडगांव मावळ सौ. अनुजा संजय अडसूळे यांचा सेवा निवृत्ती समारंभ हॉटेल चंद्रलोक लोणावळा येथे संपन्न झाला. यानिमित्त कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.
सौ अनुजा अडसूळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागात 33 वर्ष सेवा केली असता आज त्यांच्या सेवानिवृत्ती समारंभाच्या अध्यक्ष स्थानी उपविभागीय अभियंता एस. व्ही. पठाडे, माजी कार्यकारी अभियंता पाठबंधारे विभागाचे तुळशीदास एकनाथ गायकवाड हे होते तर शाखा अभियंता आर. एन. आगळे, एन. टी. खोत, डी. एम. पवार, डी. ई. राठोड, व कवयित्री, गझलकारा अर्चना मुरुगकर आणि अखिल बौध्द जन सेवा संघाचे अध्यक्ष विजयराव जाधव आदिंची सन्माननीय उपस्थिती लाभली.
मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली, उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करताना सत्कारमूर्ती अनुजाताई यांच्या कार्याला उजाळा दिला. तर कवी जयंत पवार, प्रभू जाचक, भूपेंद्र आल्हाट, गणेश पुंडे यांनी विविध कविता सादर करून कार्यक्रमात मनोरंजन केले.
यावेळी संजय अडसूळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सर्व क्षेत्रातील मान्यवरांना अडसूळे परिवाराच्या वतीने भारताचे संविधान असलेले मानचिन्ह, शाल व पुष्प गुच्छ देऊन सन्मानीत करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काव्यमित्र संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र सागर यांनी केले तर आभार प्रदर्शन मावळ वार्ताचे संजय अडसूळे यांनी केले.
सत्कारमूर्ती अनुजाताई यांना शुभेच्छा देण्यासाठी सभागृहात मित्र मंडळी, बौध्द जन सेवा संघ लोणावळा, किलबिल ग्रुपचे सर्व सदस्य, मावळ वार्ता परिवार तसेच मावळ वार्ता फौंडेशनचे नवीन भुरट, जितेंद्र कल्याणजी, मनीषा बंबोरी, विनय विद्वांस,डॉ. किरण गायकवाड,राष्ट्रवादी काँग्रेस महिलाध्यक्षा उमा मेहता, शिवसेना शहर प्रमुख बाळासाहेब फाटक, प्रा. बापुलाल तारे, बाबुभाई शेख, काँग्रेस प्रतिनिधी नासीर शेख, लोणावळा शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष विशाल विकारी, गणेश गवळी,राजेश मेहता यांच्यावतीने अनुजा ताई यांना पुष्प गुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी मावळ वार्ता परिवार व मित्र परिवार मोठया संख्येने उपस्थित होता.
- Advertisment -

You cannot copy content of this page