लोणावळा (प्रतिनिधी):अवैध गावठी दारू भट्टीवर लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या धडक कारवाईचे सत्र सुरुच आहे.त्या अंतर्गत डोंगरगाव हद्दीतील गावठी दारू भट्टीवर छापा मारत 1,600 लिटर कच्चे रसायन नष्ट करण्यात आले. सदर कारवाई शुक्रवार दि.4 रोजी 1:45 च्या सुमारास करण्यात आली.
आरोपी सूर्यदेव ऋशी राठोड (रा. डोंगरगाव, ता. मावळ, जि. पुणे ) याच्या विरोधात लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गु. रजि. नं.192/2022, महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65( फ ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल केतन महादू तळपे यांनी लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दिली आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश माने यांनी दिलेल्या माहिती नुसार आरोपी सूर्यदेव राठोड हा दि.4 रोजी 01:45 वा च्या सुमारास मौजे डोंगरगाव, ता. मावळ, जि. पुणे गावच्या हद्दीत कंजारभट वस्तीच्या पलीकडे झाडाझुडपामध्ये निळ्या रंगाचे आठ प्लास्टीकचे बॅरलमध्ये दारूसाठी लागणारे एकूण 1.600 लिटर,80,000 रू. किंमतीचे कच्चे रसायन तयार करीत असताना मिळुन आला असुन त्यास पोलीसांची चाहुल लागताच तो तेथून पळुन गेला आहे. त्याच्या विरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (फ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छापे मारीत मिळून आलेले सर्व कच्चे रसायन पोलिसांनी नष्ट केले आहे.
सहाय्यक पोलिस निरीक्षक निलेश माने यांच्या आदेशानुसार गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस हवालदार पवार हे करत आहेत.