Thursday, November 21, 2024
Homeपुणेमावळविसापूर किल्ले परिसरात अढळलेली शिवकालीन तोफ गडावर स्थलांतरीत…

विसापूर किल्ले परिसरात अढळलेली शिवकालीन तोफ गडावर स्थलांतरीत…

कार्ला (प्रतिनिधी) : विसापूर किल्ल्याच्या परिसरात आढळलेली शिवकालिन तोफ शिवप्रेमींकडून गडावर स्थलांतरित करण्यात आली आहे .
सदर तोफ काल रविवार रोजी शासकीय अधिकारी यांच्या तोंडी परवानगीने व गडपाल सतिष ढगे यांच्या उपस्थीतीत मावळ , कुलाबा , संभाजीनगर येथील शिवप्रेमी यांनी तोफेची पूजा करून सकाळी 10 वाजता ही तोफ गडावर नेण्याची मोहिम सुरू झाली . सुमारे 4 तासांच्या अथक परिश्रमानंतर ही तोफ यशस्वीरित्या गडावर स्थलांतरित करण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्पदस्पर्शाने पावन झालेल्या मावळ तालुक्यातील गडकिल्ले हे मराठ्यांच्या इतिहासाची साक्ष देत दिमाखात उभे आहेत . असाच भक्कम तटबंदी असलेला संबळगड अर्थात विसापूर किल्ला मावळ तालुक्यात आहे . या किल्याच्या पाटण पायरी मार्गाजवळ मालेवाडी गावातील आनंता गोरे या स्थानिक तरुणाला मातीत अर्धवट गाडलेली शिवकालिन तोफ आढळून आली होती . ती माहिती त्यांनी विशाल भाऊसाहेब हुलावळे , शिवप्रसाद सुतार , भीमा शिंगाडे , प्रकाश गोरे यांना कळवली होती.
त्यांनी याबद्दलची माहिती पुरातत्व विभाग , स्थानिक आमदार , खासदार , तहसीलदार , स्थानिक प्रशासन , लोकप्रतिनिधी यांना कळविली . त्यानुसार पुरातत्व खात्याचे अधिकारी गजानन मंडवरेकर यांनी शनिवार दि.5 रोजी या तोफेची पाहणी केली.
त्यानंतर रविवार दि .6 रोजी शासकीय अधिकारी यांच्या तोंडी परवानगीने व गडपाल सतिष ढगे यांच्या उपस्थीतीत मावळ , कुलाबा , संभाजीनगर येथील शिवप्रेमी ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण मरगळे , शिवप्रसाद सुतार , महेश गायकवाड , विशाल भाऊसाहेब हुलावळे , सतिष साठे , प्रकाश गोरे , बाळू गोरे , सतिष ढगे , बाबुराव तिकोणे , आनंता गोरे , विराज साठे , प्रतिक माने , मयुर पाटील , अक्षय पाटील , निखिल तांडेल , हर्षल नर , ऋषिकेश रघुवीर , जयेश मांढरे , रवी सिंग , रोहित तांडेल , वंदेश भोईर , प्रितेश पवार यांनी अथक परिश्रम घेऊन तोफ गडावर स्थलांतरीत केली.
- Advertisment -

You cannot copy content of this page