पुणे (प्रतिनिधी): केस कापण्यासाठी दुकानात गेलेल्या सात वर्षीय चिमुकल्याबरोबर दुकानातील केस कापणाऱ्या कामगाराने अनैसर्गिक कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार सोमवार दि .7 रोजी लोहगावातील संतनगर येथे घडला. याप्रकरणी पिडित मुलाच्या वडिलांनी विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे . त्यानुसार सज्जन सहेआलम सलमानी ( वय 20, रा . संतनगर , लोहगाव ) या केस कापणाऱ्या कामगाराला पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , सोमवारी पिडित सात वर्षी मुलाला त्याच्या आईने केस कापण्यासाठी संतनगर येथील एका सलुनच्या दुकानात सोडले होते . यावेळी एकटा असल्याचा फायदा घेत आरोपी केस कापनारा सज्जन याने मुलाला आतल्या खोली नेवून त्याच्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केले.आणि घडलेल्या प्रकाराबाबत कोणाला सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिली.काही वेळाने सज्जनने मुलाचे केस कापून त्याला सोडून दिले.
घरी जाताच मुलाने घडलेला प्रकार आईला सांगितला आणि प्रकरण समोर आले . मुलाच्या वडिलांनी विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली . यानंतर तातडीने सज्जन याला अटक करण्यात आली.