भिसेगाव- कर्जत ( सुभाष सोनावणे ) शासनाच्या कामात किती ढिलाई असते , ते कर्जत नगर परिषद हद्दीतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन ज्या जागेत उभारण्याचे आहे , ती जागा ताब्यात घेण्यास तब्बल १२ वर्षांचा काळ लोटला असून खोटी , चुकीची व संभ्रमित करणाऱ्या माहितीमुळे अद्यापी हे प्रकरण रेंगाळत पडले आहे , मात्र त्रुटींची पूर्तता करून लवकरच मौजे मुद्रे ( बु ) स.नं. १६ , १२३३ चौ.मी. जागेत भव्य आणि दिव्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन उभारणार , असे मत आरपीआय चे जिल्हा संपर्कप्रमुख धर्मानंद गायकवाड यांनी कर्जत येथे तहसीलदार यांना त्रुटींची पुर्तता लवकरात लवकर करा , अन्यथा आरपीआय च्या वतीने बेमुदत आमरण उपोषण करण्यात येईल , याबाबतचे निवेदन तहसीलदार डॉ.शीतल रसाळ यांना देण्यात आले.
तालुक्यातील कर्जत शहरात सर्वे नंबर १६ मधील १२३३ चौरस मीटर जागेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन उभारणे हे येथील प्रत्येक आंबेडकर अनुयायी यांचे स्वप्न आहे . नगरपरिषदेने कर्जत तहसीलदार यांच्यामार्फत मा. जिल्हाधिकारी यांनी सदर जागा कर्जत नगर परिषदेकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनासाठीचा प्रस्ताव हस्तांतरित करणे संदर्भात प्रस्ताव विभागीय कोकण आयुक्त यांच्यामार्फत मा. प्रधान सचिव महसूल मंत्रालयात पाठविण्यात आला आहे , मात्र मंत्रालय स्तरावर सदर जागा हस्तांतर प्रस्तावात काही त्रुटीची पूर्तता करण्याचे प्रकरण कर्जत तहसीलदार यांचे कडे आले आहे.
सदर प्रस्तावाच्या त्रुटींची पूर्तता महसूल विभागाच्या स्तरावरून करण्यात आली नसल्याचे दिसून येत असून म्हणूनच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले ) या राजकीय पक्षाचे कार्यकर्ते कर्जत नगर परिषदेने ठराव क्र. ३९२ दिनांक १४ ऑक्टोबर २०१० रोजी व सर्वसाधारण सभा क्र. ६२० दि. २६ ऑगस्ट २०१२ अन्वये वरील वर्णनाची मिळकत जमीन डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनांसाठी कर्जत नगरपरिषदेला ताब्यात घेण्यासाठी सर्वानुमते ठराव पारित केला होता , मात्र इतक्या वर्षांत अद्यापही जमीन मिळकत नगरपालिकेने ताब्यात घेतलेची दिसून येत नाही , ही बाब सामाजिक दृष्टीने गंभीर स्वरूपाची आहे म्हणूनच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या वतीने बेमुदत आमरण उपोषण करण्यासंबंधीचे निवेदन आज कर्जत तहसीलदार डॉ. शितल रसाळ यांना आरपीआयचे जिल्हा संपर्कप्रमुख धर्मानंद गायकवाड , तालुकाध्यक्ष हिरामण गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली देऊन शासनाला क्रोध इशारा देण्यात आला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनासाठी कर्जत नगर परिषदेने मागणी केलेला भूखंड सरकारी मालकीचा आहे , या भूखंडातून भूमी अभिलेख कार्यालयाचा नकाशा मध्ये रस्ता दाखविण्यात आला आहे मात्र सदर रस्ता सद्यस्थितीला पश्चिमेला नसून पूर्वेला आहे , या खोडसाळ कृतीमुळे मंडळ अधिकारी कर्जत त्यांच्या मार्फत स्थळ पाहणी व स्थळ पाहणी नकाशा बनवून मा. जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केल्यास ही त्रुटी पूर्ण होणार आहे , म्हणूनच महसूल विभाग मंत्रालय स्तरावरून काढण्यात आलेली रस्ता बाबतची त्रुटी पूर्ण होत नसल्याने अद्याप सदर भूखंड कर्जत न.प. कडे हस्तांतरण करण्यास विलंब होत आहे म्हणूनच कर्जत तहसीलदार यांनी जागा हस्तांतरण बाबत प्रलंबित त्रुटींची पूर्तता लवकरात लवकर करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन उभारण्यासाठी लवकरात लवकर पाऊले उचलावीत , अन्यथा याबाबतीत आरपीआय च्या वतीने बेमुदत आमरण उपोषण करण्यात येईल , असा क्रोध ईशारा देण्यात आला आहे.
यावेळी धर्मानंद गायकवाड़ जिल्हा संपर्क प्रमुख , तानाजी गायकवाड , नरेश गायकवाड उपाध्यक्ष रायगड जिल्हा , हिरामण भाई गायकवाड तालुका अध्यक्ष कर्जत , अलका सोनावणे महिला ता. अध्यक्ष , अक्षता गायकवाड ता. उपाध्यक्ष , दिनेश गायकवाड ता. कार्याध्यक्ष , अमर जाधव ता.युवा अध्यक्ष , वैशाली महेश भोसले कर्जत शहर अध्यक्ष महिला , अनंता खंडागळे ता. महासचिव , भालचंद्र गायकवाड ता. संघटक , प्रकाश गायकवाड ता.उपाध्यक्ष , प्रफुल ढाले ता.उपाध्यक्ष , अंकुश सुरवशे ता. उपाध्यक्ष , जगदिश शिंदे ता.उपाध्यक्ष किशोर गायकवाड ता.उपाध्यक्ष , दिपक गायकवाड ता.उपाध्यक्ष , विकास गायकवाड ता.सह सचिव , जिवक गायकवाड ता.सह सचिव, गौतम ढोले , संदीप गायकवाड उमरोली जि.प. वार्ड अध्यक्ष ,प्रविण गायकवाड उमरोली पं. समिती वार्ड अध्यक्ष , सुरेखा कांबळे नेरळ शहर अध्यक्ष महिला , अशोक गायकवाड , प्रेमनाथ जाधव , विजय गायकवाड , अमित गायकवाड , शशिकांत उबाळे , विशाल गायकवाड त्याचप्रमाणे अनेक आरपीआय पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.