if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
कार्ला (प्रतिनिधी): मावळ तालुक्यातील मुंढावरे ग्रुप ग्रामपंचायतच्या विद्यमान सदस्या सौ.भारतीताई नवनाथ थोरवे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.
भारतीताई थोरवे यांनी “राष्ट्रवादी” मध्ये प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादी परिवार व आमदार सुनील शेळके यांच्यावतीने राष्ट्रवादी परिवारात सहभागी झालेल्या सर्वांचे स्वागत करण्यात आले तसेच पक्षाची ध्येय धोरणे व कार्य तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी आपण सर्व कटिबद्ध रहाल,अशी आशा आमदार शेळके यांनी व्यक्त केली आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस कार्याध्यक्ष दिपक हुलावळे, चेअरमन बाळासाहेब भानुसघरे, प्रदेश सचिव अमोल केदारी, रोहिदास वाघमारे, सचिव, अंकुशभाऊ टाकळकर सनी जाधव,गोरक्ष बांगर, सागर रणपिसे,नवनाथ थोरवे, किसन गरवड आदि जन उपस्थित होते.