if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
लोणावळा (प्रतिनिधी): जमिनीचे खोटे कागदपत्र तयार करून खोटा मालक उभा करून फसवणूक केल्या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी 5 आरोपींना अटक केली आहे.
याप्रकरणी आकाश वसंत ठाकूर (रा . पेण जि . रायगड ), अमोल कृष्णा दाभोळकर( रा . अंधेरी मुंबई ),रवी दशरथ कालेकर (रा . कुसगांव ),यांनी ओळख दाखवून अविनाश नथुराम होजगे( रा . भांगरवाडी लोणावळा ) यांनी मध्यस्ती करून व विश्वास संपादन करून मधुसुदन शोभाचंद तापडीया (रा . ठाणे) व विजय बलराम शर्मा (रा . घाटकोपर मुंबई ) यांनी संगनमत करून ती जागा खरेदी केली असल्याने यातील पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
याप्रकरणी अभय जसानी यांच्या वतीने रतन मोतीराम मराठे (रा.भुशी लोणावळा ता . मावळ, जि . पुणे ) यांनी लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे.सदर फिर्यादेवरून फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयातील पाच आरोपींना 12 नोव्हेंबर रोजी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी अटक केली असून त्यांना 18 तारखे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार मौजे काले, पवनानगर ता . मावळ जि . पुणे येथील जमीन गट नं .404 क्षेत्र 1 हेक्टर 56 आर चे मुळ मालक अभय जसानी या नावाने खरेदी केलेला मुळ दस्त मुळ मालकाने निबंधक दुय्यम कार्यालयामधून घेवून न गेल्याची माहिती मिळाल्याने त्याची संधी आरोपींना मिळताच त्यांनी सदरचा दर काढून घेवून एक वयस्कर इसम त्याचे नाव अभय जसानी आहे असे सांगून त्याचे अभय घनशाम जसानी नावाने आधारकार्ड , पॅनकार्ड तयार करुन त्या आधारे लोणावळा येथील दुय्यम निबंधक कार्यालय लोणावळा येथे दि . 6/10/2022 रोजी येवून अभय जसानी याचे नाव धारण केलेला इसम नामे लालजीभाई भानुप्रसाद अधियारु (वय 62 व सध्या रा . गोरेगांव मुंबई ) यास हा खरा आहे असे सांगून त्यास विश्वास संपादन करून मधुसुदन शोभाचंद तापडीया (रा . ठाणे ) व विजय बलराम शर्मा (रा.घाटकोपर मुंबई )
यांनी संगनमत करून ती खरेदी केली आहे .
वगैरे फिर्यादेतून लोणावळा ग्रामीण पोलीसांनी वरील आरोपींना अटक केली असून आरोपींनी या आगोदर अशा प्रकारे किती गुन्हे करून जनतेची फसवणूक केली आहे काय ? याबाबत कसून तपास सुरु आहे.अशाप्रकारे मावळ परीसरामध्ये यापुर्वीसुध्दा बरेच लोक जमीनीवर डोळा ठेवून त्या जमनीमध्ये कोणी येत जात नसल्याची माहिती घेवून त्या जागेवर दुसरा इसम उभा करून आपआपसात खरेदी विक्रीचे व्यवहार करत असल्याबाबत तक्रारी दाखल आहेत . यापुढे जर अशा प्रकारची कोणाची फसवणूक झाली असेल तर संबंधीत पोलीस स्टेशनला संपर्क साधन्याचे आवाहन सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या वतीने करण्यात आले आहे.
सदरची कामगीरी ही पोलीस अधीक्षक अंकित गोयल,अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, लोणावळा उप विभागीय अधिकारी सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तीक यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ , सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश माने , सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन राऊळ , व पोलीस अंमलदार यांनी केली असून पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस करत आहेत.