मावळ (प्रतिनिधी):मावळ तालुका खादीग्राम उद्योग संघाच्या चेअरमन पदी कांचन लक्ष्मण भालेराव तर व्हा. चेअरमन पदी अमित ओव्हाळ यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.
मावळ तालुका खादीग्राम उद्योग संघावर पंचवीस वर्षानंतर आज भाजपा, आर पी आय (A) व बाळासाहेबांची शिव सेना या महायुतीचा झेंडा फडकला आहे.या निवडीनंतर मावळ तालुका महा युतीच्या वतीने वडगांव मावळ येथील कार्यालयात आनंद साजरा करण्यात आला.
यावेळी नवनिर्वाचित चेअरमन व व्हा. चेअरमन यांना शुभेच्छा देण्यासाठी मावळातील महा युतीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.