if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
लोणावळा (प्रतिनिधी):जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली लोणावळा नगरपरिषद कार्यालयाच्या स्थायी समिती सभागृहात शहरातील वाहतूक समस्येवरील उपाययोजनेबाबत बैठक पार पडली. शहरातील वाहतूक समस्येविषयी शास्त्रशुद्ध पध्दतीने अभ्यास करुन वाहतूक व्यवस्थापन आराखडा आठवड्याभरात तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिल्या आहेत.
यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक मितेश गट्टे, मुळशी मावळचे उपविभागीय अधिकारी संदेश शिर्के, वडगाव मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पंडीत पाटील, लोणावळा शहर पोलीस निरीक्षक सिताराम डुबल आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. देशमुख म्हणाले, शहरातील वाहतूकीची समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाच्या वतीने तात्काळ कार्यवाही करावी. शहरातील वाहतूक समस्येबाबत व्यापारी संघटना, सामाजिक संस्था, रिक्षा संघटना आदींसोबत नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांनी बैठक घेवून त्यांच्या अडीअडचणी समजून घ्याव्यात. कुसगाव टोल नाका आणि वरसोली टोल नाका या दोन्ही नाक्यावर नागरिकांना पथकर (टोल) भरावा लागत असल्यामुळे वाहने शहरात येतात, याबाबत शासनाकडे प्रस्ताव सादर करावा. शहराची सर्व अर्थव्यवस्था पर्यटनावरच अवलंबून असल्यामुळे पर्यटकांना मुलभूत सुविधा पुरिवण्याकडे विशेष लक्ष द्यावे, असेही जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले.