Friday, November 22, 2024
HomeपुणेलोणावळाCNG गॅस दरवाढी विरोधात लोणावळ्यात धरणे आंदोलन...

CNG गॅस दरवाढी विरोधात लोणावळ्यात धरणे आंदोलन…

लोणावळा (प्रतिनिधी ): CNG गॅस दरवाढी विरोधात आज टुरिस्ट टॅक्सी चालक मालक संघटना व रिक्षा चालक मालक संघटनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक लोणावळा येथे धरणे आंदोलन करण्यात आले.

यावेळी CNG गॅसचे दर कमी करण्यात यावेत, लोणावळा कामशेत दरम्यान एकच CNG पंप असल्यामुळे वाहन धारकांना CNG भरण्यासाठी दिवस दिवस भर रांगेत उभे रहावे लागते यादरम्यान आणखी एक पंप उभारण्यात यावा यासारख्या मागण्या करण्यात आल्या.

तसेच मावळ तालुक्यातील कोथुर्णे येथील चिमुरडीच्या हत्येतील आरोपी नराधमास फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी ही मागणी यावेळी टुरिस्ट टॅक्सी चालक मालक संघटनेकडून करण्यात आली.

रिक्षा चालक व सर्वसामान्य नागरिकांची अनेक वाहने सीएनजीवर धावतात . मावळ तालुका परिसरातील सीएनजी गॅसचा भाव बुधवारी 6 रुपयांनी वाढवत 91 रुपयांवर गेला . गेल्या पाच महिन्यात तब्बल 29 रूपयांची वाढ झाली . लवकरच हा आकडा शतक पार करेल ? याची भितीही नागरिकांमध्ये आहे . ही दरवाढ , प्रचंड महागाई व बेरोजगारीच्या संकटात सापडलेल्या सर्वसामान्य नागरिक व रिक्षा चालकांत तीव्र नाराजी असून तीव्र शब्दात आज निषेध करण्यात आला आहे.

- Advertisment -

You cannot copy content of this page