Covid-19 चे लसीकरण मावळ तालुक्यातील सरकारी रुग्णालयात व खाजगी रुग्णालयात सुरू..

0
293
आज दिनांक 03मार्च 2021रोजी मा.तहसीलदार श्री मधुसुदन बर्गे यांचे ग्रामीण रुग्णालय वडगाव मावळ कान्हे याठिकाणी covid-19 चे लसीकरण झाले..

16 जानेवारी 2021 पासून संपूर्ण देशभरात covid-19 लसीकरण सुरू करण्यात आले होते. सुरुवातीच्या प्रथम टप्प्यात फक्त आरोग्य कर्मचारी व इतर शासकीय कर्मचारी यांचे लसीकरण करण्यात आले. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार 01 मार्च 2021 पासून देशभरात सामान्य नागरिक साठी देखील लसीकरण मोहीम सुरू करण्यात आलेली आहे .त्यानुसार मावळ तालुक्यात देखील 1 मार्च 2021 पासून 45 ते 59 या वयोगटातील मधुमेह,उच्चरक्तदाब असणारे व्यक्ती तसेच 60 वर्षापुढील सर्व व्यक्तींसाठी लसीकरण सुरू झाले आहे.

लसीकरण दुसऱ्या टप्प्याबाबत महत्त्वपूर्ण बाबी::

पात्र लाभार्थी

1)HCW- शासकीय आणि खासगी सर्व डॉक्टर्स आणि स्टाफ, आशा,अंगणवाडी सेविका, मदतनीस

2)FLW- पोलिस,महसूल, तलाठी,NDRF,CRPF, नगर परिषदेचे कर्मचारी

3)PRI- पंचायत समिती स्तरावरील सर्व स्टाफ उदा.ग्रामसेवक,शिक्षक,बांधकाम विभाग,पशुधन विभाग इ.

4) 45 ते 59 वयोगटातील मधुमेह व उच्च रक्तदाब इत्यादी आजार असणाऱ्या व्यक्ती
5) 60 वर्ष व त्यापुढील वयोगटातील सर्व व्यक्ती

सामान्य नागरिकांसाठी लसीकरण नोंदणी प्रक्रिया

1)cowin.gov.in या website
किंवा आरोग्य सेतु app किंवा co-win app ला जाउन स्वत: नोंदणी करणे.

2) लसीकरण केंद्रावर जाउन त्याच ठिकाणी नोंदणी करून लगेच लसीकरण करणे

HCW ,FLW,PRI यांच्यासाठी नोंदणी प्रक्रिया::

ज्या HCW,FLW,PRI कर्मचारी यांचे वय 45 ते 59 आहे परंतु इतर कोणताही आजार नाही त्यांनी तसेच ज्या व्यक्तीचे वय 45 पेक्षा कमी आहे त्यांनी लसीकरण केंद्रावर जाउन त्याच ठिकाणी नोंदणी करून लगेच लसीकरण करणे.

लसीकरण कोठे चालू आहे??

शासकीय रुग्णालय::
1)ग्रामीण रुग्णालय वडगाव मावळ काने फाटा
2)प्राथमिक आरोग्य केंद्र तळेगाव दाभाडे
3)प्राथमिक आरोग्य केंद्र कार्ला 4)प्राथमिक आरोग्य केंद्र येळसे
5)प्राथमिक आरोग्य केंद्र आढ़ले

सर्व शासकीय केंद्रांवर लसीकरण हे निशुल्क केले जाणार आहे कोणत्याही प्रकारची फी आकारली जाणार नाही.

खाजगी रुग्णालय::

1) पवना हॉस्पिटल सोमाटणे फाटा
2) पायोनियर हॉस्पिटल सोमाटणे फाटा
3)अथर्व हॉस्पिटल तळेगाव दाभाडे 4)भाऊसाहेब सरदेसाई ग्रामीण रुग्णालय ,मायमर मेडिकल कॉलेज तळेगाव दाभाडे
5)संजीवनी हॉस्पिटल लोणावळा

या खाजगी रुग्णालयात शासनाने निश्चित केलेल्या दराप्रमाणे म्हणजे रुपये 250 प्रमाणे शुल्क आकारले जाणार आहे.

लसीकरणासाठी आवश्यक कागदपत्रे:
1) शासकीय कर्मचारी असल्यास कार्यालयाचे ओळखपत्र
2) आधार कार्ड, पॅन कार्ड ,ड्रायव्हिंग लायसन, पेन्शन प्रमाणपत्र यापैकी कोणतेही एक चालेल
3) 45 ते 59 वयोगटातील व्यक्तींनी कोणताही आजार असल्यास त्याबाबतचे डॉक्टरांचे प्रमाणपत्र सोबत आणावे.

2 मार्च 2021 पर्यंत तालुक्यात 5983 लाभार्थ्यांचे लसीकरण पूर्ण झालेले आहे त्या पैकी कोणालाही लसीकरणामुळे मोठ्या प्रकारचा त्रास उद्भवलेला नाही. पात्र लाभार्थ्यांनी आपले लसीकरण पूर्ण करून घ्यावे. लसिकरण केंद्रावर एकाच वेळेस गर्दी करू नये. कोवीडचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता लसीकरण करून घेणे फायदेशीर असेल असे आवाहन मा.तहसीलदार श्री मधुसुदन बर्गे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.जयश्री ढवळे यांनी केले आहे.