Covid-19 लसीकरण CO WIN ॲपच्या सहाय्याने पूर्ववत सुरू..

0
108

आठवड्यातून चार दिवशी सर्वत्र देण्यात येणार लस…

मावळ.दिनांक 19 जानेवारी 2021रोजी एकूण 41 लाभार्थ्यांना covid-19ची लस दिली गेली.आज अखेर प्रगतीपर एकुण 75 लाभार्थ्यांचे लसीकरण ग्रामीण रुग्णालय वडगाव मावळ कान्हे या लसीकरण केंद्रावर पुर्ण करण्यात आले आहे.


COWIN ॲप आज पूर्ववत सुरू झाले असून आज प्रत्येक लाभार्थ्याची पडताळणी ऑनलाइन ॲपद्वारेच करून लसीकरणानंतर देखील संपूर्ण प्रक्रिया online पणे पूर्ण करण्यात आली.सदर केंद्रावर सिरम इन्स्टिट्यूट निर्मित COVI-SHIELD लसीचा औषध पुरवठा जिल्हा परिषद पुणे यांच्या मार्फत नियमित सुरू झालेला आहे.


आज रोजी 41 लाभार्थी व प्रगतीपर 75 लाभार्थ्यांचे लसीकरण पूर्ण आजअखेर 75 लाभार्थ्यांना लस दिल्या पैकी कोणाही लाभार्थ्यांना कोणत्याही प्रकारचा मोठा त्रास उद्भवला नाही. सर्व लाभार्थी लसीकरणानंतर व्यवस्थित आपल्या सेवेत कार्यरत आहेत. जे लाभार्थी लसीकरणास निश्चित केलेल्या दिवशी येऊ शकले नाहीत ते त्यानंतरच्या पुढील लसीकरण असलेल्या दिवशी देखील लसीकरणास येऊ शकणार आहेत. याबाबत ऑप्शन निर्माण करण्यात आलेला आहेे.


ज्या शासकीय आरोग्य संस्थातील आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांचे यापूर्वी लसीकरणासाठी रजिस्ट्रेशन करण्यात आलेले आहे त्यांना जर अगोदरच लसीकरण करावयाचे असल्यास ते उस्फूर्तपणे लसीकरणाच्या दिवशी केंद्रावर स्वतःचे ओळखपत्र दाखवून लसीकरण करून घेऊ शकतात.

राज्यस्तरावर सध्या लसीकरणाबाबत चे आठवड्यातील मंगळवार, बुधवार, शुक्रवार, शनिवार हे चार दिवस निश्चित करण्यात आलेले आहेत. मावळ तालुक्यात देखील या चारच दिवशी लसीकरण सत्र सुरू राहणार आहेत.जे लाभार्थी नोंदणीकृत आहेत त्यांना लसीकरणाच्या एक दिवस अगोदर केंद्रस्तरावरून मोबाईल संदेशाद्वारे लसीकरणाचे ठिकाण व वेळ कळविण्यात येणार आहे व त्यानुसार सदर लाभार्थी केंद्रावर पोहोचतात.

याप्रमाणेच पुढील लसीकरण कार्यवाही सुरू राहणार आहे.मा.संजय देशमुख आरोग्य उपसंचालक पुणे मंडळ पुणे,मा अशोक नांदापुरकर ,जिल्हा शल्यचिकित्सक पुणे यांचे मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधीक्षक डॉ. जयश्री ढवळे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ.चंद्रकांत लोहारे हे सदर केंद्रावर कामकाज पाहत आहे. डॉ मिलिंद सोनावणे, डॉ शशांक धंगेकर हे संपूर्ण लसीकरणाचे नियोजन दैनंदिन यशस्वी पूर्ण करत आहेत.

लसीकरणासाठी नोंदणी केलेल्या सर्व वैद्यकीय अधिकारी ,डॉक्टर ,कर्मचारी यांनी वेळापत्रकाप्रमाणे व आलेल्या संदेशानुसार लसीकरण करून घ्यावे व उस्फूर्तपणे नाव येण्याच्या अगोदर देखील शासकीय आरोग्य अधिकारी कर्मचारी यांनी अगोदर देखील लसीकरण केल्यास हरकत नाही याबाबतचे आवाहन वैद्यकीय अधीक्षक व तालुका आरोग्य अधिकारी यांनी केले आहे.