Thursday, November 21, 2024
HomeदेशG 20 परिषदेत परदेशी पाहुण्यांच्या सत्काराचा मान महाराष्ट्रातील प्रगतशील महिला शेतकऱ्यांना…

G 20 परिषदेत परदेशी पाहुण्यांच्या सत्काराचा मान महाराष्ट्रातील प्रगतशील महिला शेतकऱ्यांना…

नवी दिल्ली (जयपाल पाटील): G20 शिखर परिषद नवी दिल्ली येथे दि.9 सप्टेंबर रोजी पौष्टिक तृण धान्य प्रदर्शनामध्ये जगभरातील अनेक महत्वाच्या देशांच्या पंतप्रधान व अध्यक्ष यांच्या पत्नीनी भेट दिली.त्यांचा सत्कार करण्याची संधी महाराष्ट्रातील प्रगतशील महिला शेतकऱ्यांना प्राप्त झाली.
प्रदर्शनामध्ये देशभरातील अनेक राज्यातून तृण धान्य लागवड करणारे शेतकरी उत्पादक कंपनीचे प्रतिनिधी, अधिकारी,कृषि व संलग्न विषयाची विद्यापीठे व संस्था यांचा लक्षणीय सहभाग होता.तृण धान्य उत्पादक मध्यप्रदेश मधील मांडला जिल्ह्यातील लहरिबाई यांनी तृण धान्याच्या 150 हुन अधिक जाती जतन केल्या आहेत.हा सर्वांचा कौतुकाचा विषय होता.
यावेळी जगभरातुन पंतप्रधान व राष्ट्रपती यांच्या पत्नी यांनी या प्रदर्शनात सहभाग नोंदवला. यावेळी यांचे सत्कार करण्याचे मान महाराष्ट्र राज्याला मिळाले.सौ.अनिता योगेश माळगे यांना ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी ओसोनक यांची मिसेस,व इटली प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांचा सत्कार करण्याचा मान मिळाला,सौ.अनिता माळगे व साऊथ कोरिया पंतप्रधान यांची पत्नी युन सिक,ओयोल व इमाणुल,फ्रान्स पंतप्रधानांची पत्नी यांचे सत्कार रायगड जिल्ह्यातील भारती कातकरी यांनी केले .केंद्रीय मसाला पिके संशोधन संस्था,राष्ट्रीय दूध विकास संस्था कर्नाटक,राष्ट्रीय पुष्प उत्पादन संस्था पुणे व भारतीय कृषि अनुसंधान संस्था दिल्ली अशा राष्ट्रीय पातळीवरील संस्था व त्यांचे संशोधन मांडणी केले होते.ड्रोन, हायड्रोपोनिक, महाराष्ट्र व कर्नाटक मधून शेतकरी कंपनीने मिलेट व मिलेट पासून बनवलेले पदार्थ यांची मांडणी केली होती.
महाराष्ट्र राज्यातून रणरागिणीना G20 शिखर परिषदमध्ये निवड व सहभागी होण्यापर्यंत (अपर मुख्य सचिव कृषी) श्री.अनुप कुमार , (आयुक्त कृषी) श्री सुनील चव्हाण,(संचालक निविष्ठा व गुणनियंत्रक) श्री विकास पाटील, (संचालक आत्मा) श्री. दशरथ तांभाले,(विभागीय कृषी सहसंचालक पुणे) श्री रफिक नाईकवडी, रायगड जिल्हाधिकारी श्री योगेश म्हसे,(जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सोलापूर) श्री.दत्तात्रय गावसाने,(जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रायगड) सौ उज्वला बाणखेले,(आत्मा प्रकल्प अधिकारी, सोलापूर) श्री.मदन मुकणे,(वरिष्ठ शास्त्रज्ञ केविके, सोलापूर) श्री. लालासाहेब तांबडे,(नाबार्ड डीडीएम सोलापूर ) श्री.नितीन शेळके व (बीटीएम रायगड) सौ. प्रज्ञा पाटील यांनी सर्वतोपरी सहकार्य अणि मार्गदर्शन केले.यावेळी परदेशी पाहुण्यांच्या सत्काराची संधी महाराष्ट्रातील महिला प्रगतिशील शेतकऱ्यांना प्राप्त झाली असून महाराष्ट्रातील महिला शेतकऱ्यांनी जगभरात झेंडा रोवला आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page