HRCT स्कॅनच्या नावाखाली रुग्णांची लूटमार करणाऱ्या डायग्नोस्टिक सेंटरवर कारवाई करा…प्रांत अधिकारी संदेश शिर्के..

0
507

लोणावळा दि.17: मा. प्रांत अधिकारी मुळशी व मावळ यांनी सी टी स्कॅनच्या नावाखाली रुग्णांची फसवणूक होत असल्यामुळे आज HRCT ( सिटी स्कॅन ) करणाऱ्या सर्व डायग्नोस्टिक सेंटरला कोणीही रुग्णांची फसवणूक करू नये म्हणून दर जारी केले आहेत.

ते दर पुढील प्रमाणे असतील दि.17/4/2021 रोजी काढलेल्या आदेशानुसार कोरोना रुग्णांचे सि टी स्कॅन 16 स्लाईस कमी असल्यास 2000/ रुपये,16 ते 64 स्लाईससाठी (MDCT) 2500/रुपये तर 64 पेक्षा जास्त स्लाईस (MDCT) 3000/ रुपये दर शासनाकडून घोषित करण्यात आले असून त्यासंदर्भात डायग्नोस्टिक सेंटरमधील बिलांची तपासणी शासनाद्वारे नियुक्त लेखापरीक्षण अधिकारी करणार असून ठराविक दरापेक्षा जास्त बिल आकारणाऱ्या डायग्नोस्टिक सेंटरच्या विरोधात आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये कारवाई करण्यात येईल असे आदेश प्रांत अधिकारी संदेश शिर्के यांनी काढले आहेत.

परंतु यापूर्वी लोणावळा डायग्नोस्टिक सेंटर कडून जे रुग्णांचे नातेवाईक व रुग्णांडून जास्तीचे रुपये आकारण्यात आले आहेत त्यांचे जास्तीचे रुपये लोणावळा डायग्नोस्टिक सेंटरने त्या रुग्णांना परत करावे अशी मागणी माजी उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक श्रीधर पुजारी यांच्या बरोबर इतर नागरिकांनी केली आहे. तरी शासनाने यांच्या मागणीचा पूर्वविचार करावा.