PMRDA च्या विरोधात कार्ला फाटा येथे एकविरा कृती समितीचे रास्ता रोको आंदोलन संपन्न…

0
662

कार्ला दि.8 : PMRDA च्या प्रारूप विकास आराखड्याला विरोध दर्शविण्यासाठी एकविरा कृती समितीच्या वतीने कार्ला फाटा येथे मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.


पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण ( PMRDA ) यांनी लोणावळा ग्रामीण परिसराचा प्रारूप विकास आराखडा तयार करताना अनेक ठिकाणी झोन बदल करण्यात आले आहेत. तसेच रस्त्यांसाठी जागा करताना स्थळ पाहणी करण्यात आलेली नाही.


PMRDA चा हा विकास आराखडा जाचक असून यात अनेक शेतकरी व नागरिक बाधित होत आहेत. अशा या जाचक आराखड्याला विरोध या रास्ता रोको आंदोलनाने दर्शविण्यात आला. यावेळी एकविरा कृती समितीचे सर्व पदाधिकारी, सदस्यांसमवेत शेतकरी व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. सदर आंदोलनात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.