Saturday, September 21, 2024
HomeपुणेलोणावळाRTI कार्यकर्ते प्रकाश मिश्रीमल पोरवाल यांच्या विरोधात 420 गुन्हा दाखल, वडगाव न्यायालयाने...

RTI कार्यकर्ते प्रकाश मिश्रीमल पोरवाल यांच्या विरोधात 420 गुन्हा दाखल, वडगाव न्यायालयाने दिले आदेश..

लोणावळा : प्रकाश मिश्रीमल पोरवाल ( रा. लोणावळा ) यांनी एका विधवा महिलेची जमीन बळकवली असून त्याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात भा. द. वी. कलम 404, 420, 406, 504, 506 (2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी गिता अशोक अगरवाल यांनी यासंदर्भात न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग वडगाव मावळ यांच्या कडे दि.24/6/2021 रोजी गुन्ह्याबाबतचे विविध कागदपत्रे दाखल केली आहेत.

आरोपीने तक्रारदाराच्या सासूच्या बाजूने यापूर्वीच विकल्या गेलेल्या जमिनीसंदर्भात त्याच्या बाजूने विक्री कराराची अंमलबजावणी केली. या गुन्ह्यामध्ये फसवणूक आणि बनावट गोष्टींचा समावेश आहे.तसेच आरोपीने विश्वासाचा भंग करून फसवणूक केली आणि आरोपी असूनही त्याने फिर्यादीला धमकावले असे आरोप सदर तक्रारी मार्फत करण्यात आले आहेत.

त्यानुसार सर्व कागदपत्रांची पडताळणी करून केल्या गेलेल्या गुन्ह्यांचे प्रकार व नोंदवलेल्या कागदपत्रांची नोंद लक्षात घेता या प्रकरणाची पोलीस यंत्रनेमार्फत सविस्तर चौकशी होणे आवश्यक असल्याने सी.आर.पी.सी. 156 (3) अन्वये चौकशीचे आदेश लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशनला देण्यात आले होते त्यानुसार लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये प्रकाश मिश्रीमल पोरवाल यांनी पुणे जिल्हा कार्याध्यक्ष मा.अण्णा हजारे निर्मित भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन व प्रदेश उपाध्यक्ष मा. शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटना या दोन्ही पदांचा गैरवापर करत असल्याचे समजत आहे.

एका विधवा महिलेची फसवणूक करून तीची जमीन बळकावल्या प्रकरणी न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल लवटे हे पुढील तपास करत आहेत.

- Advertisment -

You cannot copy content of this page