Sunday, July 14, 2024
HomeपुणेलोणावळाTSAT ग्रुप व सुन्नी मुस्लिम जमात ट्रस्ट आयोजित "नात - ए -...

TSAT ग्रुप व सुन्नी मुस्लिम जमात ट्रस्ट आयोजित “नात – ए – रसूल मुकाबला 2022″संपन्न…

लोणावळा (प्रतिनिधी): TSAT ग्रुप व सुन्नी मुस्लिम जमात लोणावळा आयोजित “नात -ए -रसूल मुकाबला 2022” काल दि.20 रोजी हजरत कासम शाहवली रहे दर्गाह येथे संपन्न झाला. या स्पर्धेत परिसरातील 100 हून अधिक स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदविला होता.
यावेळी लहान मुला – मुलींनी मंचावर नात प्रस्तुत करून सर्व पाहुणे व प्रेक्षकांना मंत्र मुग्ध केले.लहान्यांचा उत्साह व कला पाहून कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जिशान शेख यांनी आनंदित होऊन तीनही ग्रुप मधील प्रथम क्रमांकाच्या विजेत्यांना वैयक्तिक प्रत्येकी 2500 रु. रोख बक्षीस जाहीर केले. तसेच लोणावळा नगरपरिषद उर्दू माध्यमिक विद्यालयात मार्च 2022 SSC बोर्डाच्या परीक्षेत प्रथम आलेली कु. सेफी सलीम खान या विद्यार्थिनीला 11 हजार रु. रोख बक्षीस देण्यात आले.
सदर स्पर्धेतील तीन ग्रुपमध्ये प्रत्येकी तीन क्रमांकाचे पारितोषिक काढण्यात आले. त्यानुसार TSAT ग्रुपच्या वतीने प्रथम क्रमांकास 1500 रु.रोख, सन्मानचिन्ह,सन्मानपत्र, दुसऱ्या क्रमांकास 1000 रोख, तर तिसऱ्या क्रमांकास रोख 500 रु. देण्यात आले. त्याचबरोबर सुन्नी मुस्लिम जमात ट्रस्टच्या वतीने नऊ स्पर्धकांना पाणी बॉटल व टिफिन बॉक्स असे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.तसेच TSAT ग्रुपच्या वतीने सर्व सहभागी स्पर्धकांना बक्षीस देण्यात आले.
यावेळी TSAT ग्रुपचे मेंबर ताहीर शेख सर, आजाद खान, सद्दाम खान, तज्जमूल शेख यांनी सुन्नी मुस्लिम जमात ट्रस्ट चे आभार व्यक्त केले. यावेळी लोणावळा शहरातील उद्योजक जिशान शेख, सुन्नी मुस्लिम जमात ट्रस्टचे चेअरमन शफी अत्तार, व्हाईस चेअरमन रफिक हुसेन शेख,ट्रस्टी हाजी इस्साक पटेल, ट्रस्टी हाजी नूरमहंम्मद काठेवाडी आदी प्रमुख पाहुणे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रजामुराद सर यांनी केले तर मान्यवरांचे आभार प्रदर्शन सईद सर यांनी केले.
- Advertisment -

You cannot copy content of this page