Thursday, October 17, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडअंजप ग्रामपंचायत हद्दीत धाराची वाडी येथील अनेक " आदिवासी बांधवांचा " राष्ट्रवादी...

अंजप ग्रामपंचायत हद्दीत धाराची वाडी येथील अनेक ” आदिवासी बांधवांचा ” राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश !

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा राजिप चे मा. उपाध्यक्ष ” सुधाकर भाऊ घारे ” हे कर्जत खालापूर मतदार संघातील ” सर्वगुणसंपन्न ” नेतृत्व आहेत . रायगड जिल्ह्याचे भीष्माचार्य तथा कोकणचे भाग्यविधाते खासदार सुनील तटकरे साहेब यांच्या ” खास मर्जीतील ” असल्याने त्यांचा या मतदार संघात वाढता प्रभाव दिसून येत आहे . गरजवंताना करत असलेल्या मदतीचे व विकास कार्याचा आढावा बघता रोजच अनेक कार्यकर्ते पक्ष प्रवेश त्यांच्या कार्यालयात होत असताना दिसत आहेत . ग्रामीण भागात आदिवासी बांधावांत त्यांचे ” नेतृत्व ” अनेकांना पसंत आहे , ते त्यांच्या कार्यकर्तृत्वामुळेच . आज बुधवार दिनांक ०२ ऑक्टोंबर २०२४ रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून कर्जत तालुक्यातील अंजप ग्रामपंचायत हद्दीत धाराची वाडी येथील अनेक आदिवासी बांधवांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर पक्ष प्रवेश झाला.
संजय मिणमिणे आणि चंद्रकांत मिणमिणे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या पक्ष प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सुधाकर भाऊ घारे यांचे हात यानिमित्ताने मजबूत झाले आहेत .हा पक्षप्रवेश सोहळा कर्जत येथील राष्ट्रवादी काँग्रेस जनसंपर्क कार्यालयात मा. मधुकर भाऊ घारे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस रायगड जिल्हा सरचिटणीस प्रकाश पालकर , कर्जत खालापूर विधानसभा सरचिटणीस अरुण कराळे , कर्जत तालुका महिला अध्यक्षा ऍड. रंजना धुळे , कर्जत तालुका युवक अध्यक्ष स्वप्नील पालकर , कर्जत तालुका सोशल मिडिया सेल अध्यक्ष सुजित भोईर , अरुण कराळे , संजय मिणमीने , चंद्रकांत मिणमीने , संतोष माळी , युवा नेते केतन बेलोसे , महेश मिसाळ , समीर मसणे , तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते .सर्वाँना पक्षात मानसन्मान दिला जाईल.
आपल्या गावातील सर्व अडचणी सोडवून विकास कार्ये करण्यात येतील , असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते मधुकर भाऊ घारे यांनी याप्रसंगी दिले .
- Advertisment -

You cannot copy content of this page