Friday, November 22, 2024
Homeपुणेकामशेतअखेर कामशेत प्राथमिक आरोग्य केंद्रातील त्या बेजबाबदार निवासी डॉक्टरची बदली...

अखेर कामशेत प्राथमिक आरोग्य केंद्रातील त्या बेजबाबदार निवासी डॉक्टरची बदली…

कामशेत(प्रतिनिधी): कामशेत मधील प्राथमिक आरोग्य केंद्र या शासकीय दवाखान्यात डिलिव्हरी करण्यासाठी एक भगिनी दाखल झाली होती परंतु त्या ठिकाणी निवासी डॉक्टर नसल्याने वेळीच उपचार न मिळाल्याने त्या भगिनी चे बाळ दगावले होते .

सदर घटनेची गांभीर्याने दखल घेत दि.14 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी पुणे ( co ) आयुष प्रसाद यांनी डॉक्टर किरण जाधव यांची तात्काळ बदली केली आहे . या घटने विरोधात कामशेत येथील नागरिक संतप्त झाले होते.भाजपा विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अभिमन्यू शिंदे यांनी या घटनेची दखल घेत पुणे जिल्हा सीओ आयुष प्रसाद यांना तात्काळ या घटनेची माहिती दिली होती . त्यांनी घटनेची चौकशी करून कारवाई करू असे आश्वासन दिले होते .

यावेळी कामशेत मधील पुणे जिल्हा RPI युवक अध्यक्ष समीर जाधव , सामाजिक कार्यकर्ते दत्ता काजळे , मा.ग्रा.पं. सदस्य सुभाष गायकवाड , शहराध्यक्ष प्रवीण शिंदे , सामाजिक कार्यकर्ते किशोर ओव्हाळ , मा ग्रा.पं. सदस्य संतोष कदम , सामाजिक कार्यकर्ते गणेश लालगुडे , सोनू गायकवाड , सनी टकले , समीर भोसले यांनी संबंधित डॉक्टरवर कारवाई करण्याची मागणी केली होती . तसेच कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता.

- Advertisment -

You cannot copy content of this page