![]()
if(isset($image4)); {?>
![]()
} ?>
if(isset($image5)); {?>
![]()
} ?>
कामशेत : मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवे लगत बेडसे (ता. मावळ) येथील नाल्यात एका युवकाचा निर्घृण खून करून मृतदेह टाकल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात कामशेत पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अज्ञात आरोपीने दिनांक १८ जून २०२५ रोजी अज्ञात कारणावरून, अज्ञात ठिकाणी धारदार शस्त्राने गळ्यावर आणि पोटावर वार करून एका अनोळखी युवकाची हत्या केली. त्यानंतर खुनाचे पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह वाहनातून आणून तो बेडसे गावच्या हद्दीतील एक्सप्रेस वे जवळील पाण्याच्या नाल्यात (कि.मी. ७१/३५०) टाकण्यात आला. याप्रकरणी कामशेत पोलीस ठाण्यात गु.र. नं. १२५/२०२५ भादंवि कलम १०३(१), २३८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर मृत युवकाची ओळख अद्याप पटलेली नसून, पोलिसांकडून मिळालेल्या वर्णनानुसार त्याचे वय अंदाजे ३० ते ३५ वर्षे, रंग काळा सावळा, उंची सुमारे ५ फूट ५ इंच, अंगाने सडपातळ, डोक्यावर कमी केस, कोरलेली दाढी व बारीक मिशी आहे. त्याने पांढऱ्या रंगाचा फुलबाह्यांचा शर्ट, काळ्या/रासवाडी रंगाची जीन्स पॅण्ट आणि Calvin Klein कंपनीची अंडरविअर परिधान केली होती.
या युवकाची ओळख पटविण्यासाठी तसेच नातेवाईकांचा शोध घेण्यासाठी कामशेत पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे. नागरिकांनी वरील वर्णनाशी जुळणारी कोणतीही माहिती आढळल्यास तात्काळ खालील संपर्क क्रमांकावर कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
संपर्क: रविंद्र पाटील, पोलीस निरीक्षक – ९९२३४०७३११ , दत्तात्रय शेडगे, पो.उपनिरीक्षक – ७४९८३१६२१८ ,समीर करे, पो.हवालदार – ९९३०६०१०००, मणेश तावरे, पो.हवालदार – ९९२३४२१८५४