if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
झारीतील शुक्राचार्य कोण ? तमनाथ नदीतील बेकायदेशीर काम सुरूच..
भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) कर्जत तालुक्यातील तमनाथ , आडीवली, नेवाली , आवळस , मोहीली , बीड , शिरसे या गावांना तसेच भविष्यात कर्जत शहराला देखील होणारा पुराचा संभाव्य धोका ओळखून तमनाथ गावात उल्हास नदी पात्रात सुरू असलेले बेकायदेशीर काम किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील गोगटे व येथील शेतकरी बांधवांनी केलेल्या तक्रारी व आमरण उपोषणाचा केलेला इशारा तरीसुध्दा निवडणूक ” आचार संहिताचे ” नाव पुढे करत ” कागदी घोडे ” पुढे करणारे कर्जत तहसीलदार शीतल रसाळ व पाटबंधारे विभागाचे उपअभियंता गुंटूरकर यांनी नदीच्या पात्रात सुरू असलेल्या कामांवर अद्यापी कुठलीच कारवाई केली नसल्याने ” राजकीय वरदहस्त ” असल्यामुळेच एक अधिकारी दुसऱ्या अधिकाऱ्याकडे बोट दाखवीत अकार्यक्षम कारवाईची ” टोलवाटोलवी ” करत असल्याचा आरोप भाजप किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील गोगटे यांनी केला असून शेतकरी व येथील गाव – वाड्या – पाड्यातील नागरिकांना ” मृत्यूच्या दाढेत ढकलणारा ” हा ” झारीतील शुक्राचार्य ” कोण ? असा सवाल उपस्थित करून आम्ही देखील हि लढाई आता आरपारची लढणार असल्याचे , संतप्त मत सुनील गोगटे यांनी भाजप किसान मोर्चाच्या संपर्क कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
गेली महिनाभर होत असलेले उल्हास नदी पात्रातील बेकायदेशीर काम हे ” ब्लू लाईनच्या ” आत असल्याने भविष्यात पावसाच्या पाण्यामुळे पुराचा धोका ओळखून जीवितहानी न होण्यासाठी व शेतीचे होणारे नुकसानी पासून बचावासाठी शेतकरी बांधवांसाठी हा लढा उभारला असून कर्जत तालुक्यातील अधिकारी वर्ग आपले कर्तव्यात कसूर करत असल्याने आम्ही जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडे लवकरच तक्रार करणार आहोत , आणि त्यांनी देखील राजकीय वरद हस्ताच्या दडपणाखाली येत आम्हाला न्याय न दिल्यास ” हरित लवादा ” कडे तक्रारी करू , तर प्रसंगी न्यायालयाकडून या सर्वांना विरोधी पार्टी करून या बेकायदेशीर अनिष्ट कामावर रोक लावण्यासाठी स्टे ऑर्डर आणू , यावर प्रकाश टाकला . अधिकार दिलेले तालुक्यातील ” बुजगावणे ” प्रथम अधिकारी बेकायदेशीर व नागरिकांना पुराच्या पाण्याचा धोका आहे.
असे लेखी पत्र देवून सदरचे बांधकाम रोखू शकत नसल्यास , अश्या अधिकाऱ्यांचा कर्जतकर नागरिकांना काय उपयोग ? असा सवाल प्रदेश उपाध्यक्ष सुनील गोगटे यांनी उपस्थित केला आहे.यावेळी या पत्रकार परिषदेस भाजप किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सुनील गोगटे , उत्तर रायगड किसान मोर्चा अध्यक्ष अतुल दादा बडगुजर , जनार्दन म्हस्कर – किसान मोर्चा सरचिटणीस , विनायक पवार – विधानसभा संयोजक किसान मोर्चा , शिरीष कदम – कर्जत तालुका अध्यक्ष किसान मोर्चा ,
हरिश्चंद्र मांडे – उपाध्यक्ष उत्तर रायगड किसान मोर्चा , युवा मोर्चा कर्जत शहर अध्यक्ष सर्वेश गोगटे , मिलिंद भोईर आदी पदाधिकारी व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.