Friday, November 22, 2024
Homeपुणेलोणावळाअहिल्याबाई होळकर संस्थेकडून विविध संस्थांसाठी मार्गदर्शन शिबीर भाजे येथे संपन्न…

अहिल्याबाई होळकर संस्थेकडून विविध संस्थांसाठी मार्गदर्शन शिबीर भाजे येथे संपन्न…

लोणावळा (प्रतिनिधी): अहिल्याबाई होळकर संस्थेच्या वतीने भाजे येथे महाराष्ट्रातील विविध संस्थांना सी एस आर चे धडे देण्यात आले. आज दि.23 रोजी भाजे येथील हॉटेल वृंदावन येथे हे शिबीर संपन्न झाले. याशिबिरास महाराष्ट्रातून तब्बल 84 संस्थांनी आपला सहभाग नोंदविला.
यामध्ये संस्थांनी कशाप्रकारे काम केले पाहिजे, संघटित होऊन आपण कोण कोणती व किती चांगल्या प्रकारे कामे करू शकतो,अगदी गावपातळीवर जाऊनही आपल्याला किती कामे करता येऊ शकतात यावर अहिल्याबाई संस्था अध्यक्ष संदीप कुमार नाचन यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
लोणावळा येथील अहिल्याबाई होळकर संस्था ही सध्या महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये विविध भागांमध्ये काम करणाऱ्या संस्थांना घेऊन सीएसआरच्या माध्यमातून काम करणार आहे. ही संस्था पुढील दोन वर्षांमध्ये सुमारे 300 संस्थांचा मोठा जाळ महाराष्ट्रभर निर्माण करून समाज उपयोगी कामे करणार असल्याचे प्रतिपादन . संस्थेचे अध्यक्ष संदीप कुमार नाचन यांनी केले आहे.
कोरोना कालावधीमध्ये सर्व व्यवस्था कोलमडून पडली होती. त्याचा परिणाम सर्व सामाजिक संस्थांवरही झालेला दिसून येतो. यासाठी संस्थांना पुन्हा उभे करण्यासाठी व त्यांच्याकडून समाज उपयोगी व विकासात्मक कामे करून घेण्यासाठी अहिल्याबाई होळकर संस्था लोणावळा यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी या संस्थांना सीएसआर बाबत मार्गदर्शन करणे आणि त्या माध्यमातून विविध समाजोपयोगी कामे करणे यासाठी संस्थांना प्रशिक्षण देण्याचे सत्र सुरू केले आहे. दिनांक 6 मे रोजी आणि दिनांक 21 मे रोजी या संस्थेने महाराष्ट्रातल्या विविध संस्थांसाठी प्रशिक्षण सत्र ठेवले होते. तसेच उर्वरित इच्छुक संस्थांसाठी दिनांक 28 मे रोजी शेवटचे प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
या मार्गदर्शन शिबिरात महाराष्ट्रातून बुलढाणा, अमरावती, अकोला, नागपूर, भंडारा, सातारा, पुणे, मुंबई, सोलापूर, रत्नागिरी, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजी नगर, जालना, उस्मानाबाद, लातूर, नांदेड अशा विविध जिल्ह्यातून सुमारे 84 संस्थांनी प्रशिक्षण घेतले व लिंकेज झाल्या आहेत. त्यांना योग्य कामाची दिशा मिळाली असून त्यांच्या माध्यमातून खूप चांगले समाजोपयोगी कामे होणार आहेत.
या कार्यासाठी श्रावस्ती बहुउद्देशी विकास प्रबोधिनी बुलढाणा चे अध्यक्ष संदीप सुखधान, आम्ही सावित्रीच्या लेकी मुंबईचे सुनील भोसले , ओमकार महिला विकास प्रतिष्ठान सातारा च्या सुनीता पाटणे यांनी पुढाकार घेत विशेष परिश्रम घेतले आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page