Friday, November 22, 2024
Homeपुणेलोणावळाआई वडिलांच्या पुण्यतिथी निमित्त नंदकुमार वाळंज यांनी राबविले महाआरोग्य शिबीर…

आई वडिलांच्या पुण्यतिथी निमित्त नंदकुमार वाळंज यांनी राबविले महाआरोग्य शिबीर…

लोणावळा (प्रतिनिधी):लायन्स क्लब ऑफ लोनावला लेजेन्टस चे ज्येष्ठ सदस्य श्री नंदकुमार (बाबूजी) वाळंज यांच्या आई वडिलांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने भव्य मोफत महाआरोग्य शिबीर दि.28 ऑक्टोबर रोजी अंबावणे येथे घेण्यात आले.
या शिबिरात विविध आरोग्य तपासण्या करण्यात आल्या, तसेच विविध सत्कार समारंभ व मदत कार्य देखील करण्यात आले. आयोजित शिबिरात 721 लोकांची आरोग्य तपासणी तर 400 लोकांची जनरल तपासणी करण्यात आली.320 लोकांची हाडांची तपासणी,135 लोकांची डोळ्याची तपासणी तर 60 लोकांची दाताची तपासणी करण्यात आली.312 लोकांचे ब्लड शुगरची तपासणी करण्यात आली.148 लोकांचे ब्लड ग्रुपची तपासणी करण्यात आली.178 लोकांचे हाडाचा ठिसूळपणा म्हणजे (Bone density) चेक करण्यात आले.
600 रुग्णांना मोफत औषध उपचार करण्यात आले.60 रुग्णांची रक्ताची तपासणी करण्यात आली.35 रुग्णांची कॅन्सर ची तपासणी अशा विविध तपासण्या करून 80 लोकांची आभा कार्ड ची नोंद करण्यात आली.व 560 रुग्णांना मोफत यश हॉस्पिटल मित्र कार्ड देण्यात आले ज्यामुळे ते पूर्ण वर्षभरासाठी वैद्यकीय सुविधा घेऊ शकतात.यावेळी घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरामध्ये वीस लोकांनी सहभाग घेऊन रक्तदान केले. त्या प्रत्येक रक्तदात्याला प्रत्येकी पाच लाखाचे इन्शुरन्स देण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रोजेक्ट प्रमुख लायन नंदकुमार वाळंज व यश हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर हेमंत अग्रवाल हे होते. हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी देवरे सर,लायन सुरेश गायकवाड, लायन अमित अग्रवाल,डॉ राजू खंडेलवाल यांनी विशेष परिश्रम घेतले.
तसेच या कार्यक्रमासाठी लोणावळ्यातील यश हॉस्पिटल,भोसरी येथील ओम हॉस्पिटल,पुणे येथील देसाई ट्रस्ट, मावळ वार्ता फाउंडेशन,मनशक्ती केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र आंबवणे,आंबी व्याली हॉस्पिटल व कोराईगड शिक्षण संस्था यांनी प्रामुख्याने सहभाग घेतला.
नागरिकांच्या तपासण्या करण्यासाठी डॉ.राशी मोदी, डॉ.नेहेल खंडेलवाल, डॉ.सुहास गोसावी, डॉ. अशीता शहा,डॉ.मोहिते,
डॉ.राजेश चव्हाण,नंदकिशोर खंडेलवाल.ओम हॉस्पिटलची टीम आदिजण उपस्थित होते.
या प्रसंगी सुप्रसिद्ध कीर्तनकार ह. भ. प. समाधान महाराज शर्मा यांचे कीर्तन पार पडले. यावेळी उपस्थित पाचशे वारकरी बांधवाना शबनम भेट देण्यात आली व बाल आशा घर येथील सर्व विद्यार्थ्याना थंडीचे जर्किन वाटप करण्यात आले.या कार्यक्रमाचे औचित्य साधून अंबावणे गावातील “श्री शंकर ” मंदिरा जवळ लोणावळा लायन क्लब लिजन्ट्स यांच्या वतीने भाविकांसाठी स्वच्छता गृह 2 युनिट देण्यात आले.या भव्य दिव्य कार्यक्रमासाठी मुळशी व मावळ मधील सर्व क्षेत्रातील नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.तर वाळंज विद्यालयातील सर्व शिक्षक कर्मचारी यांनी सदर नियोजनात सहभाग घेतला व कार्यक्रम यशस्वी केला.
- Advertisment -

You cannot copy content of this page